छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकाच वेळी १९२० शाळांत झाली पालक सभा, जिल्हाधिकारी म्हणाले...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : संस्कारक्षम व गुणवत्ताधारक विद्यार्थी घडविण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या दशसूत्री उपक्रमांतर्गत आज, २५ नोव्‍हेंबरला एकाच वेळी १९२० शाळांत पालक सभांचे आयोजन करण्यात आले. आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत. चांगले नागरिक घडविण्यासाठी त्यांचा सर्वांगिण विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षणासोबत त्यांच्यावर संस्कार रुजविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

गाडीवाट केंद्र कचनेर (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित पालक सभेला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी स्वतः उपस्थित होते. जिल्ह्यात दशसूत्री या उपक्रमांतर्गत संस्कारक्षम, आरोग्यक्षम, कौशल्य क्षम, स्पर्धा क्षम विद्यार्थी घडविण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होणे अपेक्षित असून त्याद्वारे शैक्षणिक गुणवत्तेसोबतच अन्य संस्कार जसे संतसाहित्य वाचन, पौष्टिक आहाराबाबत जागृती, क्रीडा कौशल्य, ज्येष्ठांचा आदर यासारख्या अनेक बाबी शिकविल्या जात आहेत. या उपक्रमात पालकांचा सहभाग आवश्यक असून त्यासाठी या उपक्रमाबाबत पालकांना आजच्या पालकसभांद्वारे अवगत करून त्यांना सहभाग देण्याबाबत आवाहन करण्यात आले.

589516214_1178845847679776_53945 (1)

गाडीवाट येथील प्राथमिक शाळेतील पालक सभेत जिल्हाधिकारी स्वामी यांच्या समवेत सरपंच ज्ञानेश्वर भालके, तहसीलदार शिवानंद बिडवे, गट शिक्षणाधिकारी चेतन कांबळे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीराम केदार, मंडळ अधिकारी आश्विनी सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आसिफ शेख, कोळगे गुरुजी, मुख्याध्यापक प्रभाकर गायकवाड आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, की संत साहित्यात जीवनाविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन आहे. ते संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवायला हवे. आयुष्यात येणारे लहानमोठे अपयशाचा ते सामना करू शकले पाहिजे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाला गावातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विस्तार अधिकारी श्रीराम केदार यांनी आभार मानले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software