विद्यापीठात आज केंद्रीय युवक महोत्सवाचा शोभायात्रेने होणार प्रारंभ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाला आज, २७ सप्टेंबरला शोभायात्रेने प्रारंभ होणार आहे. पाचही रंगमंचांसह महोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे.

विद्यापीठाचा हा केंद्रीय युवक महोत्सव २९ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. महोत्सवात चार जिल्ह्यांतून २६२ संघ आणि १ हजार २१ कलावंत सहभागी होणार आहेत. महोत्सवाचे उद्‌घाटन महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात यांच्या हस्ते आज सकाळी दहाला विद्यापीठ नाट्यगृहात होईल. कुलगुरू डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी राहणार आहेत. या वेळी विभागाचा माजी विद्यार्थी तथा दिग्दर्शक रावबा गजमल अतिथी म्हणून उपस्थित राहील. कार्यक्रमास प्र- कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. योगिता होके पाटील, अ‍ॅड. दत्तात्रय भांगे, संचालक डॉ. कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे

सकाळी शोभायात्रा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यापासून शनिवारी सकाळी आठला शोभायात्रेस प्रारंभ होईल. पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्या हस्ते फेरीस हिरवा झेंडा दाखविण्यात येईल. या वेळी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानंतर उद्‌घाटन सोहळा होईल. सर्व पाचही रंगमंचांवर कला प्रकारांना सादरीकरण सुरू होईल.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software