पाडापाडी केली, पण बेघरांना घर मिळवून देण्यासाठी जी. श्रीकांत यांची धडपड, सरकारकडे केली ही मोठी मागणी!; कॅरिबॅगविरुद्धही लवकरच मोहीम छेडणार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : रस्ता रूंदीकरण मोहीम राबवताना अनेकांची घरे पाडली गेली. त्यांच्यासाठी ‘म्हाडा’ची घरे उपलब्ध करून द्यावीत, यासाठी आता महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी प्रयत्‍न सुरू केले आहेत. तशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. भविष्यातही प्रकल्पग्रस्तांसाठी वेगळी तरतूद ठेवावी लागेल. त्याशिवाय रस्ते रूंद होणार नाहीत, असे मत त्‍यांनी व्यक्‍त केले आहे.

पहिल्या टप्प्यात उपलब्ध होणारी १५० घरे निर्वासितांना दिली जातील, असे सांगून जी. श्रीकांत म्हणाले, की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही आणखी घरांची मागणी केली आहे. या मोबदल्यात म्हाडाला जागा, निधी काय द्यायचे ते ठरवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र रस्ता रूंदीकरण मोहीम थांबणार नाही. लवकरच ती पुन्हा सुरू होईल, असे सूतोवाच त्यांनी केले.

कॅरिबॅगविरुद्ध पुन्हा मोहीम छेडणार
लवकरच कॅरिबॅगविरुद्ध जोरदार मोहीम छेडली जाणार आहे. कॅरिबॅग शहरात आणणारे, ठोक व किरकोळ विक्रेते रडारवर आणण्यात येऊन मोठ्या व्यापाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय जी. श्रीकांत यांनी घेतला आहे. महावीर चौकात १३ सप्टेंबरला १८०० किलो कॅरिबॅगचा साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची पाहणी बुधवारी (१७ सप्‍टेंबर) टाऊन हॉल येथे जी. श्रीकांत यांनी केली. गुजरातच्या वापी येथून जालन्याला या कॅरिबॅग जात होत्‍या. व्यापाऱ्याला २५ हजार रुपयांचा दंड महापालिकेने केला आहे.

आता नागरी मित्र पथकाला कॅरिबॅग विक्रेत्‍यांविरुद्ध कारवाईसाठी रस्‍त्‍यावर उतरविण्यात येणार आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग आढळल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. दरम्‍यान, सध्या घनकचरा विभागाचा कारभार यापूर्वी लोकप्रतिनिधींनी गंभीर आरोप केलेल्या वादग्रस्त अधिकाऱ्याकडे आहे. त्‍यामुळे ही मोहीम किती प्रामाणिकपणे राबवली जाईल, याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. कन्‍नडमध्ये कार्यरत असतानाही या अधिकाऱ्याबद्दल मोठी नाराजी उफाळून आली होती. त्‍यात आता हा अधिकारी पुन्हा महापालिकेत बदलून आल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

Latest News

सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
वैजापूर/पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सत्यनारायणाच्या पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी...
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
२० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज MIDC तील रांजणगाव शेणपुंजीची घटना
शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगसेवकांनी पराभूत भाजप उमेदवाराच्या घरासमोर नाचवली तलवार!, विजयी रॅलीदरम्यान प्रभाग १८ मधील धक्कादायक प्रकार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software