- News
- सिटी डायरी
- चमत्कार की शास्त्र? छत्रपती संभाजीनगरातील या चमत्कारिक घटनेने सारेच अचंबित!!, ४० वर्षीय महिलेसोबत क...
चमत्कार की शास्त्र? छत्रपती संभाजीनगरातील या चमत्कारिक घटनेने सारेच अचंबित!!, ४० वर्षीय महिलेसोबत काय घडलं..., उभीही राहू न शकणारी महिला चक्क गाण्यावर थिरकली कशी?
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मानो या ना मानो, अशीच घटना छत्रपती संभाजीनगरात समोर आली आहे. ४० वर्षीय भाग्यशाली गाडेकर (रा. बुलडाणा) या महिलेने हा आश्चर्यकारक अनुभव घेतला आणि तो याचि देही याचि डोळा अनेकांनी अनुभवला... ज्यांनी ते पाहिले, ते सारेच अचंबित आहेत, की हे घडलं कसं... ही ताकद संमोहनशास्त्राची असल्याचे तज्ज्ञ एस. के. नांदेडकर यांनी ‘मेट्रोपोलिस पोस्ट-छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज’ला सांगितले.
भाग्यशाली गाडेकर यांना साधारण २ महिन्यांपूर्वी अचानक पाय आणि कंबरेत प्रचंड वेदना सुरू झाल्या. हे कशामुळे घडलंय हे कळायला मार्ग नव्हता. त्यांनी बुलडाण्यातील दोन रुग्णालयांत उपचार घेतले. मात्र बरे वाटत नसल्याने छत्रपती संभाजीनगरला बहिणीकडे येऊन ४ रुग्णालयांत उपचार घेतले. मात्र तरीही त्यांना फरक पडला नाही. त्यांच्या बहिणीच्या मुलाला संमोहनशास्त्र एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेबद्दल माहीत होते. त्यांनी मावशीला कार्यशाळेत जाण्याबद्दल सांगितले. त्यानंतर भाग्यशाली गाडेकर, त्यांची बहीण आणि बहिणीचा मुलगा हे गेल्या आठवड्यात एस. के. नांदेडकर यांच्या पॉवर ऑफ सबकॉन्शिअस माइंड या कार्यशाळेत सहभागी झाले.
भाग्यशालीताई चक्क गाण्यावर थिरकल्या...
संमोहनशास्त्र तज्ज्ञ एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेत सोमवारी आल्या तेव्हा अगदी बसूही न शिकणाऱ्या, लोळण घेणाऱ्या भाग्यशाली गाडेकर या शेवटच्या दिवशी शुक्रवारी चक्क अन्य सदस्यांसोबत गाण्यावर थिरकल्या. हे पाहून त्यांच्या बहिणीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. हे चमत्कारिक वाटत असले तरी संमोहनशास्त्राचा आविष्कार आहे. हजारो रुग्णांना व्याधीमुक्त करणारे, अनेकांना मानसिक-शारीरिक समस्यांतून मुक्त करणारे एस. के. नांदेडकर यांची कार्यशाळा आजसुद्धा (११ नोव्हेंबर) सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत छत्रपती संभाजीनगरमध्ये आयडियल निसर्गोपचार केंद्र, आकृती आर्केड (अंडर ग्राऊंड हॉल ) महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर, वरद गणेश मंदिराशेजारी, समर्थनगर येथे होत आहे. या कार्यशाळेचा लाभ मोफत घेता येईल, मात्र त्यासाठी आधी नावनोंदणी गरजेची आहे. त्यासाठी 8087492943 किंवा 9850170936 या नंबरवर कॉल करून नोंदणी करावी, असे आवाहन कार्यशाळेच्या आयोजकांनी केले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
By City News Desk
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
By City News Desk
Latest News
18 Mar 2026 20:07:32
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रिजवाडी येथील गट क्रमांक ३० मधील ५४ एकर ३१ आर जमिनीच्या...

