ऐका हो ऐका... छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भरणार डाक जीवन विमा प्रतिनिधीच्या ५० जागा, नियुक्तीसाठी अर्ज मागविले

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर डाक विभागात कन्नड, गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद आणि सोयगाव या तालुक्यांमध्ये ग्रामीण डाक जीवन विमा प्रतिनिधी एकूण ५० जागांवर नेमणे आहेत.

आवश्यक पात्रता अशी वयोमर्यादा १८ ते ६० वर्षे असून, शैक्षणिक पात्रता पाच हजारांपेक्षा कमी लोकसंख्येच्या गावातील रहिवासी असल्यास किमान १० वी पास, पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावातील रहिवासी असल्यास किमान १२ वी पास आहे. सुशिक्षित बेरोजगार, निवृत्त कर्मचारी, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट यांना विशेष प्राधान्य  देण्यात येईल. इच्छुकांनी प्रवर अधीक्षक, डाकघर छत्रपती संभाजीनगर विभाग, जुना बाजार, छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयात जन्म तारीख व शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्यासाठी लागणारे मूळ कागदपत्रे, त्या कागदपत्राची एक साक्षांकीत पत्र व दोन पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज करावेत. या नियुक्ती तात्पुरत्या आणि कमिशन तत्वावर आहे याची नोंद घ्यावी, असे प्रवर अधीक्षक, डाकघर छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी कळविले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश

Latest News

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software