गुरुजींचा असाही ‘आदर्श’ : पुरस्कार वितरण सोहळ्यातच शिक्षकांनी एकमेकांना गुद्दे घातले, कपडे फाडले!, छ. संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा तर नेटका झाला, पण सोहळा सुरू असतानाच सभागृहाबाहेर शिक्षकांनी हाणामारी केल्याने गालबोट लागले. गुद्देबाज शिक्षकांचा हा प्रताप याचि देही याचि डोळा अनेकांनी पाहिला, पण प्रकरण पोलिसांत गेले नाही. आपसात मिटले. या प्रकाराची चर्चा जिल्हाभर सुरू आहे. शुक्रवारी (१२ सप्टेंबर) संत एकनाथ रंगमंदिरात हा प्रकार घडला.

प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण सोहळ्याचे प्रास्ताविक करत होत्या. त्याचवेळी सभागृहात काही शिक्षकांत ढिश्यूमऽऽ ढिश्यूऽऽ सुरू झाली. त्‍यामुळे सभागृहात बसलेल्यांनी बाहेर धाव घेतली. हाणामारीत एकमेकांचे कपडे फाडण्यापर्यंत शिक्षक धजावले. यानंतर एकमेकांविरुद्ध तक्रारी करण्यासाठी त्यांनी उस्मानपुरा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवले. मात्र नंतर हे प्रकरण अंगलट येण्याची शक्‍यता वाटल्याने हाणामारी करणाऱ्या शिक्षकांनी आपसात मिटवून घेतले.

शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी वाद झाल्याचे समजल्याचे सांगितले. मात्र कुणीही यासंदर्भात तक्रार केलेली नाही, असेही स्पष्ट केले. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्‍या शिक्षकांत हाणामारी झाली. त्‍यांच्यात एका व्हॉट्‌स ॲप ग्रुपवर गेल्या काही दिवसांपासून वादावादी सुरू होती. पुरस्कार सोहळ्यात आमनेसामने येताच त्‍यांच्यातील खुमखुमी उफाळून आली. शिक्षण विभागाची लक्‍तरे वेशीवर टांगणाऱ्या या शिक्षकांवर शिक्षण विभाग कारवाई करतो, की पाठिशी घालतो, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?

Latest News

विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय? विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्‍ट वृत्तसेवा) : विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार तथा ठाकरे गटाचे जिल्‍हाप्रमुख अंबादास दानवे यांनी...
आरटीओ कार्यालयातच भीषण दुर्घटना : चालकाने ट्रक मागे घेताना निष्काळजीपणा केला अन्‌ एजंटचा चाकाखाली येऊन मृत्यू!
व्हिडीओ : बजाजनगरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, सीसीटीव्हीत थरार कैद
भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले...
रिलस्टार अरुण तुपेचा घरातच आढळला मृतदेह!; सोशल मीडियावर दोन लाख फॉलोअर्स, पोस्ट मार्टेमच्या अंतिम अहवालातून समोर येणार कारण, पोलीस काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software