गुड न्यूज : छत्रपती संभाजीनगरात लवकरच नव्या ३४ ई-बस येणार!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याच्या अनुषंगाने स्मार्ट सिटी प्रशासन लवकरच ३४ ई- बस भाडेतत्त्वावर घेऊन शहरात आणत आहे. लवकरच या बस शहरवासीयांच्या सेवेत दाखल होत आहेत.

२०१८ पासून सुरू झालेल्या स्मार्ट सिटी शहर बस सेवेचा सध्या २० ते २२ हजार प्रवासी लाभ घेत आहेत. बिडकीन, फुलंब्री, करमाड आणि वाळूज भागातील प्रवाशांना शहरात येण्यासाठीही बससेवा सोयीस्कर ठरत आहे. सध्या शहरात स्मार्ट सिटी प्रशासनाकडे डिझेलवर चालणाऱ्या १०० शहर बस आहेत. मात्र, त्यातील वीस बस खराब झाल्या आहेत. त्यातच डिझेल बसच्या इंधनावर आणि मेंटेनन्सवर प्रचंड खर्च होत असल्याने स्मार्ट सिटी प्रशासन वैतागले आहे. शहर बससेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या पाहून स्मार्ट सिटी प्रशासनाने दोन वर्षांपूर्वीच पर्यावरण पूरक ई बस आणण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने हैदराबाद येथील एका एजन्सीसोबत करारही झाला.

मात्र, या बस शहरात दाखल होण्यापूर्वी चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु महावितरणमुळे कारभारामुळे चार्जिंग स्टेशनसाठी लागणारे स्वतंत्र फिडर आणि विजेचे उपकेंद्र उभारण्यात मोठा वेळ गेला. यामुळे करार करूनही शहरात ई बस दाखल होण्यासही उशीर लागला. मात्र, आता चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम पूर्णत्वाकडे निघाले असून पुढील काही दिवसातच उर्वरित ३४ ई- बस शहरात दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील महिनाभरात हे काम मार्गी लागलेले दिसेल, अशी अपेक्षा स्मार्ट सिटी प्रशासनाच्या बस विभागाचे मुख्य चालान अधिकारी संजय सुपेकर यांनी व्यक्त केली. सध्या शहरात एक ई - बस धावत असून, आणखी ३४ दिवस आल्यानंतर ही संख्या ३५ वर पोहोचेल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...

Latest News

सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला... सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको एन ३ भागातील टेनिस कोर्टजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने मंगळसूत्र...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software