छत्रपती संभाजीनगर जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पंचसूत्री!; ६५१ बालकांना १४ नोव्हेंबरपर्यंत कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढणार!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जिल्ह्यात ६५१ बालके कुपोषण श्रेणीत आहेत. या सर्व बालकांना येत्या १४ नोव्हेंबरपर्यंत कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढून जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, १४ ऑक्‍टोबरला पंचसूत्री दिली आहे. त्यानुसार महिला व बालविकास, आरोग्य, ग्रामविकास व महसूल यंत्रणांनी समन्वयाने काम करून जिल्हा कुपोषण मुक्त करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

महिला बालविकास विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग आणि ग्रामविकास विभाग या यंत्रणांच्या ग्राम, तालुका, उपविभाग व जिल्हास्तरीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते या वेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, जिल्ह्यात ६५१ बालके कुपोषित श्रेणीत येतात. यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ८०, कन्नड-२८, फुलंब्री ६१, सिल्लोड-९५, सोयगाव-६०, गंगापूर-१००, पैठण-१२८, वैजापूर-३८, खुलताबाद-६१ याप्रमाणे कुपोषित बालकांची संख्या आहे. या सर्व बालकांना कुपोषण श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी बालदिन म्हणजेच १४ नोव्हेंबरपर्यंतचा कालबद्ध कार्यक्रम देण्यात आला.

असा आहे कालबद्ध कार्यक्रम
१६ ऑक्टोबर रोजी गावातील कुपोषित बालकांची नोंद घेऊन ही बालके संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी दत्तक घेणे. त्यांच्या आहार, आरोग्य विषयक दैनंदिन घडामोडींवर लक्ष ठेवणे.
१७ ऑक्टोबर रोजी स्वच्छता दिवस पाळून बालकांच्या आरोग्यकारक स्वच्छतेविषयी त्यांच्या पालकांना माहिती देणे. २८ ऑक्टोबर रोजी गावातील मान्यवरांच्या हस्ते बालकांचा पौष्टिक खाऊ देणे.
३ व ४ नोव्हेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत बालकांची आरोग्य तपासणी करणे.
७ नोव्हेंबर रोजी पालकांचे समुपदेशन मेळावे घेऊन त्यांना बालकांना द्यावयाचा आहार, पोषणमूल्ययुक्त अन्न, आरोग्याची काळजी, वैयक्तिक स्वच्छता आदीबाबत मार्गदर्शन करणे.
याप्रमाणे कालबद्ध व उद्दिष्टाधारीत प्रयत्न करून १४ नोव्हेंबर बाल दिन यादिवशी जिल्ह्यातील ही सर्व ६५१ बालके कुपोषण श्रेणीतून बाहेर आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा... छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
तुझ्यामुळेच पराभूत झालो म्हणत भाजप उमेदवाराच्या घरावर टोळक्याचा सशस्‍त्र हल्ला!, क्रांती चौक भागातील गांधीनगरातील मध्यरात्रीचा थरार
विकास जैन यांनी ACP देशमुख यांचा गळा पकडून मागे ढकलले, बाकीच्यांनी हल्ला केला, म्हणून पोलिसांनी लाठीमार केला!; जैन, राजपूत, जीवनवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, शासकीय अभियांत्रिकी महावि‌द्यालयाच्या मतमोजणी केंद्रावरील दुसरी बाजू आली समोर 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software