अबब... छत्रपती संभाजीनगरात चक्क तीन लाख विसराळू खातेदार!; त्यांचे ७६ कोटी रुपये बँकेत पडून...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : अनेक जण बँकांत ठेवी ठेवतात. पण नंतर या ठेवी, बँकेतील पैसे काढून घ्यायचे विसरतात. छत्रपती संभाजीनगर शहरात तर असे तब्बल तीन लाख ठेवीदार आहेत. या सर्वांचे तब्बल ७६ कोटी रुपये विविध बँकांच्या खात्यांमध्ये वर्षानुवर्षे पडून आहेत. या विसराळू ग्राहकांना जागे करण्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेनेच पुढाकार घेतला आहे. ग्राहकांना हे पैसे काढून घेता यावेत, यासाठी विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे.

जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रेषित मोघे यासंदर्भात माहिती देताना म्हणाले की, देशभरातील विविध बँकांमध्ये थोडेथोडके नव्हे तर १.३५ लाख कोटी रुपये कुणीही दावा करीत नसल्याने नुसतेच पडून आहेत. महाराष्ट्रातील बँकांमध्ये असे ५,८६६ कोटी रुपये पडून आहेत. यात वैयक्तिक खात्यांत ४,६१२ कोटी, संस्थांच्या खात्यात १,०८२ कोटी, तर सरकारी योजनांत गुंतवलेल्या १७२ कोटी रुपयांचा समावेश आहे.

सलग १० वर्षे निष्क्रिय राहिलेल्या अशा बँक खात्यातील ठेवी ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी (डीईएएफ) मध्ये हस्तांतरित केल्या जातात. अर्थात असे असले तरी सध्याच्या जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांचा हा बँकांत विसरलेला पैसा काढून घेता येईल. अद्ययावत कागदपत्रे आणि पुन्हा केवायसी केल्यास त्यांना त्यांचे बँकांत विसरलेले पैसे काढून घेत येतील. ही जनजागृती मोहीम १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!

Latest News

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!! शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बेगमपुरा पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार गणेश गायकवाड याने वरिष्ठांच्या नावे तब्बल १४ लाख रुपयांची...
आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक, नोकरी मागण्यासाठी आला होता...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software