- News
- सिटी डायरी
- छ. संभाजीनगरात गरजू महिलांना रोजगारासाठी गुलाबी ई-रिक्षा; इच्छुकांकडून अर्ज मागविले
छ. संभाजीनगरात गरजू महिलांना रोजगारासाठी गुलाबी ई-रिक्षा; इच्छुकांकडून अर्ज मागविले
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गरजू महिलांना रोजगारासाठी गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यातून महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करता येईल हाही उद्देश आहे. गरजू महिलांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी कळविले आहे. पात्रता काय हवी?लाभार्थी महिलेचे कुटूंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गरजू महिलांना रोजगारासाठी गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यातून महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करता येईल हाही उद्देश आहे. गरजू महिलांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी कळविले आहे.
लाभार्थी महिलेचे कुटूंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. वय १८ ते ३५ दरम्यान असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. वाहन चालक परवाना असणे आवश्यक. विधवा, कायद्याने घटस्फोटीत, राज्यातील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षण गृह बालगृहातील आजी-माजी प्रवेशिता यांना प्राधान्य देण्यात येईल. दारिद्र्य रेषेखालील महिलांनाही प्राधान्य दिले जाईल.
लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. लाभार्थ्यांची निवड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती लॉटरी पद्धतीचा अवलंब करून करेल. ई –रिक्षा किमतीच्या १० टक्के पात्र लाभार्थी, २० टक्के राज्य शासन, आणि ७० टक्के बँक कर्ज या प्रमाणे निधी उपलब्ध करून दिला जाईल. कर्जाची परतफेड ५ वर्षांत करावी लागेल. या योजनेअंतर्गत एकदाच लाभ घेता येईल.
ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक खाते पासबुक, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, मतदार ओळखपत्र, रेशनकार्ड, चालक परवाना, रिक्षा ही महिलाचा चालवेल याबाबतचे हमी पत्र, अटीशर्ती पालनाचे हमीपत्र. गरजू महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी केले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
By City News Desk
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
By City News Desk
Latest News
18 Mar 2026 20:07:32
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रिजवाडी येथील गट क्रमांक ३० मधील ५४ एकर ३१ आर जमिनीच्या...

