गणेश मंडळांना घरगुती वीजदराने मिळणार वीज जोडणी; सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सार्वजनिक गणेश मंडळांकडून वीज जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्याचा निर्णय वीज महावितरण कंपनीने घेतला आहे. तात्पुरत्या स्वरुपात आणि त्वरित वीज जोडणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे. वीज जोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सार्वजनिक गणेश मंडळांकडून वीज जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्याचा निर्णय वीज महावितरण कंपनीने घेतला आहे. तात्पुरत्या स्वरुपात आणि त्वरित वीज जोडणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.

वीज जोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्था मंडप परवानगी, पोलीस ठाणे परवाना, विद्युत निरीक्षकांचे वीजसंच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी चाचणी अहवाल व राष्ट्रीयीकृत बँक खाते पासबूकची प्रत जोडावी लागणार आहे. तात्पुरत्या वीज जोडणीसाठी गणेश मंडळांना मंजूर वीजभारानुसार अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. ही रक्कम ऑनलाइन भरल्यास गणेशोत्सव संपल्यावर वीज बिलाची रक्कम वगळून उरलेली रक्कम विनाविलंब परत केली जाईल. गणेश मंडळांनी आपत्कालीन स्थितीत महावितरणच्या संबंधित शाखा अभियंत्यांशी संपर्क साधावा. संभाजीनगर शहर मंडळातील नियंत्रण कक्षाला ७०६६०४२४१२, ग्रामीण मंडळ नियंत्रण कक्षाला ७८७५७५६६५२ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. कछोट यांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software