कैद्यांनी बनवल्या छान छान वस्तू? चला खरेदी करूया, त्‍यांचा विश्वास जागवूया…!; हर्सूल कारागृहाजवळ भरलेय प्रदर्शन!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या विविध दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने २९ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान बंदीवान निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्याचे उद्‌घाटन जिल्हा न्यायाधीश सुभाष कुऱ्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास मध्यवर्ती कारागृह अधीक्षक दत्तात्रय गावडे, उपअधीक्षक संदीप भुतेकर, वरिष्ठ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या विविध दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने २९ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान बंदीवान निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्याचे उद्‌घाटन जिल्हा न्यायाधीश सुभाष कुऱ्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास मध्यवर्ती कारागृह अधीक्षक दत्तात्रय गावडे, उपअधीक्षक संदीप भुतेकर, वरिष्ठ तुरुंग अधिकारी प्रदीप रणदिवे, तुरुंग अधिकारी सतिष हिरेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कारागृहातून सुटल्यावर बंदी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावा, म्हणून बंद्यांना बंदीवासात विविध व्यवसायांचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते. जेणेकरून बंदी कारागृहातून सुटका झाल्यावर कारागृहात घेतलेल्या प्रशिक्षणाच्या आधारे आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करू शकतो.

कारागृह विभागाचे ब्रिद वाक्य सुधारणा व पुनवर्सन असून कारागृहातील बंदी हा समाजाचा एक घटक असतो. बंदीवासात तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र कारागृह उद्योग विक्री केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. विविध सणाचे औचित्य साधून बंदी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. दिवाळी सणानिमित्त यावर्षी बंद्यांनी तयार केलेल्या विविध प्रकाराच्या आकर्षक कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या वस्तू मिळणार…
फर्निचर, देवघर, सागवानी पाळणे, चौरंग पाट, बैलगाडी, टीपॉय, स्टूल, पोळपाट तसेच लोहारकाम विभागामध्ये लोखंडी स्टूल, सुपली, चप्पल स्टँड, बांगडी स्टँड, लोखंडी बैलगाडी, लोखंडी खेळण्याचे विमान तसेच विणकाम विभागामध्ये पंजादरी, पंजा चेअर मेट, दरी, जॅकेट, बेडशिट, टॉवेल, रुमाल, लेडीज पर्स, शर्ट, सुती साडी, पॉवरलूम विभागामध्ये टॉवेल, गमजे, बेडशिट, हॉस्पीटल व मांजरपाट कापड आदी वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. त्या ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनास नागरिकांनी भेट द्यावी,असे आवाहन कारागृह अधीक्षक दत्तात्रय गावडे यांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात क्रूर हत्याकांड घडवणारा गुन्हेगार हर्सूल कारागृहातून पळाला!

Latest News

छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात क्रूर हत्याकांड घडवणारा गुन्हेगार हर्सूल कारागृहातून पळाला! छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात क्रूर हत्याकांड घडवणारा गुन्हेगार हर्सूल कारागृहातून पळाला!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वांत क्रूर हत्‍याकांड घडवणाऱ्या कुख्यात बबला टोळीचा सदस्य शेख अमजद असद...
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत युतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल, भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर, खालोखाल शिंदे गट, ठाकरे गटाची काय स्थिती... जाणून घेऊ मिनिटामिनिटाचे Election Result Update 
शिवसेनेचा शिंदे गट, शिंदे गटातही दोन गट, मंत्री शिरसाट- आ. जैस्वाल यांच्यात धुसफूस?
सुसाट कंटेनरने घेतला युवकाचा बळी, चिकलठाणा आठवडे बाजारसमोर अंगावर शहारे आणणारा अपघात, साताऱ्यातही जेसीबीची ९ वर्षीय चिमुकल्याला धडक
गंगापूर पोलीस ठाण्याचे आवार बनले राजकीय कुस्तीचा ‘आखाडा’!; निवडणुकीतील धुसफुसीतून दोन गटांत तुंबळ हाणामारी, पोलिसांनी लाठीमार करून पांगवली गर्दी 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software