एमजीएमनंतर प्रसिद्ध सिग्‍मा हॉस्पिटल संशयाच्या भोवऱ्यात!; ६५ वर्षीय महिलेवर चुकीचे उपचार?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एमजीएमनंतर आता युनायटेड सिग्मा हॉस्पिटल चर्चेत आले आहे. या हॉस्पिटलवर ६५ वर्षीय महिलेवर चुकीचा औषधोपचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शनिवारी (२७ एप्रिल) रुग्णाच्या मुलाने पत्रकार परिषद घेऊन सिग्‍माला संशयाच्या कठड्यात उभे केले. रुग्ण महिलेचा मुलगा नंदकुमार पुरी, झुंजार छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील कोटकर पाटील, कार्याध्यक्ष नीलेश ढवळे, प्रदेश […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एमजीएमनंतर आता युनायटेड सिग्मा हॉस्पिटल चर्चेत आले आहे. या हॉस्पिटलवर ६५ वर्षीय महिलेवर चुकीचा औषधोपचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शनिवारी (२७ एप्रिल) रुग्णाच्या मुलाने पत्रकार परिषद घेऊन सिग्‍माला संशयाच्या कठड्यात उभे केले.

रुग्ण महिलेचा मुलगा नंदकुमार पुरी, झुंजार छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील कोटकर पाटील, कार्याध्यक्ष नीलेश ढवळे, प्रदेश सचिव सचिन खरात, प्रदेश कार्याध्यक्ष अरुण नवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की बोरी (जि. परभणी) येथील सखूबाई पुरी यांना सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांना अन्य रुग्णाच्या रिपोर्टच्या आधारे औषधोपचार देण्यात आला. पुनर्तपासणीसाठी गेल्यानंतरही अन्य रुग्णाचा रिपोर्ट देऊन त्या आधारे औषधी लिहून दिली. रुग्णाने काही दिवस औषधी घेतली. मात्र त्रास होऊ लागल्याने जवळच्या एका रुग्णालयात दाखविले असता हा प्रकार लक्षात आला. दरम्यान, सिग्मा हॉस्पिटलचे डॉ. उन्मेष टाकळकर यांनी आरोप फेटाळले आहेत. नातेवाइकांकडे चुकून दुसरे रिपोर्ट दिले गेले होते. मात्र रुग्णावर योग्य उपचार केलेला आहे. चुकीचा उपचार केलेला नाही, असे स्‍पष्टीकरण त्‍यांनी दिले. यासंदर्भातील वृत्त आजच्या अंकात एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दिले आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी

Latest News

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार असलेले कामगार-कर्मचारी, अधिकाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर...
किलेअर्क भागात ड्रग्जचा मोठा साठा जप्त, तस्कराच्याही मुसक्या आवळल्या!
पहाटेच्या ३ वाजता सुनसान रस्‍त्‍यावर कारमध्ये दोघेच, गस्तीवरील पोलिसांनी हटकले अन्‌ बिंग फुटले!, सिडको एन ७ येथे मोठी कारवाई
सिडको पोलिसांचा गौतमनगरात छापा, देशी दारूचा मोठा साठा जप्त
कोतवालपुऱ्यातून १२ वीत शिकणाऱ्या तरुणीला पळवून नेले...