वाळूज MIDC तील साईश्रद्धा कंपनीत अपघातात महिलेचा हात जायबंदी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील साईश्रद्धा एंटरप्रायजेस कंपनीत महिलेचा हात प्रेस मशीनमध्ये अडकून गंभीर दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी कंपनीमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शांता चंद्रकांत लोंढे (वय ३२, रा. शिवपार्क, कमळापूर) असे जखमी महिलेचे नाव आहे. गुरुवारी (२० नोव्‍हेंबर) कंपनीमालक संजय भोसले यांनी शांता लोंढे यांना मशीनचे प्रशिक्षण नसतानाही प्रेस मशीनवर कामाला बसवले, असा आरोप तक्रारीत लावण्यात आला आहे. त्यांचा उजवा हात मशीनमध्ये अडकून चारही बोटांना गंभीर दुखापत झाली. करंगळीजवळील बोट शस्‍त्रक्रिया करून कापावे लागले. उर्वरित बोटांना टाके घालण्यात आले आहेत. उपचारानंतरही आता दुखापत कायमस्वरुपी राहिली आहे. महिलेवर वाळूज हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software