छत्रपती संभाजीनगरात घरासमोर खेळत असताना साडेपाच वर्षांची राशी अचानक बेपत्ता!; जिल्हा पोलिसांकडून कसोशीने शोध,स्वतः SP राठोड तपासावर लक्ष ठेवून... 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : घराजवळच खेळणारी साडेपाच वर्षांची चिमुरडी अचानक बेपत्ता झाल्याने पळशी (ता. छत्रपती संभाजीनगर) शिवारातील ओंकार सिटी या बांधकाम साइटवर मंगळवारी (११ नोव्हेंबर) दुपारी तीनला खळबळ उडाली. बुधवारी (१२ नोव्हेंबर) रात्रीपर्यंत पोलीस तिचा कसोशीने शोध घेत होते. मात्र ती मिळून आली नव्हती. तिच्या अपहरणाचा संशय निर्माण झाला आहे.

राशी शिनू चव्हाण (वय साडेपाच वर्षे, मूळ रा. सेंधवा, मध्यप्रदेश, उंची साडेतीन फूट, हिंदी भाषिक) असे अपहरण झालेल्या मुलीचे नाव आहे. पळशीजवळील ओंकार सिटी बांधकाम साइटवर सेंधवा येथून चव्हाण दाम्पत्य कामानिमित्त आले आहेत. दाम्पत्य कामात असताना त्यांची मुलगी इतर कामगारांच्या मुलींसोबत खेळत होती. दुपारी काम थांबवून चव्हाण हे इमारतीखाली आले, तेव्हा इतर मुलींसोबत राशी दिसली नाही. त्यांनी इतर मुलींना विचारणा केली, मात्र त्यांना काही सांगता आले नाही. त्यामुळे घाबरलेल्या चव्हाण दाम्पत्याने अन्य कामगारांच्या मदतीने राशीचा शोध सुरू केला. मात्र राशी मिळून न आल्याने अखेर चिकलठाणा पोलिसांना कळविण्यात आले.

उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे, पोलीस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने परिसरातील पानवठे, शेततळ्यांतही शोध घेतला. पिसादेवी, पळशी परिसर पिंजून काढला. मात्र राशीचा शोध लागला नाही. श्वान पथकही माग काढू शकले नाही. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी याप्रकरणात स्वतः लक्ष घातले असून, स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना केल्या आहेत. चार पथके राशीच्या शोधासाठी तैनात करण्यात आली आहेत. इतर जिल्हा पोलिसांनाही राशीचा फोटो पाठवून कळविण्यात आले आहे. गुरुवारी अधिक कर्मचाऱ्यांसह तिचा शोध घेऊ. कुणाला राशी दिसल्यास चिकलठाणा पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software