प्रवाशांसोबत गैरवर्तन, नियमांचे उल्लंघन, शहर पोलिसांचा ५९५ रिक्षाचालकांना दणका!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : प्रवाशांसोबत गैरवर्तन, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५९५ रिक्षाचालकांना शहर पोलिसांनी आज, ७ ऑक्‍टोबरला विशेष मोहीम राबवून दणका दिला. त्यांना ६ लाख १ हजार १५० रुपयांचा दंड ठोठावला आणि ४७ हजार ५०० रुपये वसूलही केले. कारवाईत ८ रिक्षा जप्त करण्यात आलेल्या आहेत.

अनेक रिक्षाचालक विना गणवेश, विना कागदपत्रे, विना लायसन्स तसेच दारू पिऊन सर्रास रिक्षा चालवतात. काही रिक्षाचालक हे प्रवाशांसोबत गैरवर्तन करतात. गुन्हेगारी स्वरुपाचे वर्तन करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी वाहतूक विभागाला विशेष मोहीम राबवून कारवाईचे आदेश दिले आहेत. आज सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत वाहतूक विभागाच्या पाचही शाखांचे अधिकारी, अंमलदार नियम धाब्यावर बसवणाऱ्या रिक्षांवर कारवाईसाठी रस्त्यावर उतरले.

ही कारवाई पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्‍त श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्‍त सुभाष भुजंग, पोलीस निरीक्षक अमोल देवकर, पोलीस निरीक्षक राजेश यादव, सहायक पोलीस निरीक्षक हरेश्वर घुगे, सचिन मिरधे, पोलीस उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांच्यासोबत मिळून केली. यापुढेही अशाच प्रकारे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वाहनचालक परवाना, वाहनांची कागदपत्रे सोबत बाळगावी. वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
३ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला नदीकाठी!; कन्नडच्या घटनेने खळबळ
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software