जोगेश्वरीत घर फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या दागिन्यांवर मारला हात!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील जोगेश्वरीत घर फोडून चोरट्यांनी १ लाख ९५ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) सकाळी समोर आली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गणेश धोंडीराम घुले (रा. कमळापूर रोड जोगेश्वरी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, २० नोव्हेंबरला मध्यरात्री कधीतरी चोरटे रो हाऊसच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत शिरले. त्यांनी लाकडी कपाटाचे लॉक तोडून ५७ हजार २०० रुपये किंमतीचे सोन्याचे कानातले, २० हजार पाचशे रुपये किंमतीचे मंगळसूत्र, १७ हजार १३० रुपये किंमतीचे सोन्याचे मनी, २४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे वेल, ४५ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत असा १ लाख ९५ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. अधिक तपास वाळूज एमआयडीसी पोलीस करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ

Latest News

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातून ५ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील ३...
प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software