मोबाइल दुकान फोडणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या!; दोन साथीदारांचा शोध सुरू, वाळूज MIDC पोलिसांची कामगिरी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाणेगाव येथील समर्थ मोबाईल शॉपी फोडून चोरी करणाऱ्याला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी आज, २१ ऑक्‍टोबरला पहाटे राहत्‍या घरातून ताब्‍यात घेतले. शेख इरफान शेख लाल, (वय ३२, रा. हुसैन कॉलनी, छत्रपतीसंभाजीनगर) असे या संशयिताचे नाव आहे.

नवनाथ रावसाहेब काटकर (रा. घाणेगाव) यांनी या प्रकरणात तक्रार दिली होती. १७ ऑक्‍टोबरला रात्री उशिरापर्यंत त्यांचे बंधू शुभम काटकर यांनी दुकानाची साफसफाई केली आणि नंतर दुकान बंद करून घरी आले. १८ ऑक्‍टोबरला पहाटे साडेतीनच्या सुमारास तोंडाला रूमाल बांधून आलेल्या ३ चोरट्यांनी शटर उचकटून आत शिरत गल्ल्यातील २० हजार रुपये चोरून नेले होते. गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे  पोलीस चोरट्यांना शोधत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाथरकर व त्यांच्या सहकाऱ्यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या.

पोलीस पथकाने घाणेगाव येथील घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता हा गुन्हा पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या शेख ईरफानने केल्याचे समोर आले. त्याला आज पहाटे घरातून अटक करण्यात आली. दोन साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली त्याने दिली. त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. त्‍याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्‍त केली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त, संजय सानप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाथरकर, श्रेणी पोलीस उप निरीक्षक दिनेश बन, पोलीस अंमलदार धीरज काबलीये, सुरेश कचे, सुरेश भिसे, हनुमान ठोके, संदीप तागड, शिवनारायण नागरे, रवि गायकवाड, संतोष बमनाथ, दीपक जाधव, सचिन ठोकळ यांनी केली. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अंमलदार मंगेश मनोरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश

Latest News

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software