कंपनीतून घरी येण्यासाठी निघालेला कामगार बेपत्ता, पत्नीची पोलिसांत धाव, वाळूज MIDC तील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटीतील कामगार कंपनीतून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाला आहे. त्याच्या पत्नीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती हरवल्याची तक्रार दिली आहे. ही घटना बुधवारी (१७ डिसेंबर) सायंकाळी सातला समोर आली.

बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव अमोल सुभाष देशमुख (वय ३६, रा. वडगाव कोल्हाटी) आहे. ते रांजणगाव शेणपुंजी येथील प्रणाली इंडस्ट्रीत काम करत होते. रोज ते कंपनीतून सायंकाळी सव्वासातपर्यंत घरी येतात. मात्र बुधवारी घरी न आल्याने पत्नीने कॉल केला असता मोबाइल बंद आला. त्यांच्या सहकाऱ्याला कॉल केला असता त्यांनी कंपनीतून अमोल हे केव्हाच निघून गेल्याचे सांगितले. त्यामुळे पत्नी अनुसया यांनी पतीचा शोध सुरू केला. नातेवाइकांकडे चौकशी केली. इतर ठिकाणी शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाहीत. अखेर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून हरवल्याची तक्रार दिली. अमोल यांचे वर्णन असे : बांधा सडपातळ, उंची ५ फूट ५ इंच, रंग गोरा, डोळे काळे, चेहरा लांबट, केस काळे, अंगात गुलाबी शर्ट, काळी पँट.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना

Latest News

कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कॉपीमुक्त अभियान राबविणे हे नितीमान नागरिक घडविण्याचे अभियान आहे. त्यामुळे हे अभियान यशस्वी करणे...
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
तुझ्यामुळेच पराभूत झालो म्हणत भाजप उमेदवाराच्या घरावर टोळक्याचा सशस्‍त्र हल्ला!, क्रांती चौक भागातील गांधीनगरातील मध्यरात्रीचा थरार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software