पत्नीच्या डोक्यात मुसळी घातली, मुलाला हातावर काच मारून केले जखमी, पोलिसांत जाऊ नये म्हणून घरात कोंडले, सातारा परिसरातील घटना 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पती-पत्‍नीतील क्षुल्लक वादानंतर पतीने पत्नीला मारहाण करत मुसळी डोक्यात मारून जखमी केले. आईला वाचवायला मध्ये पडलेल्या १४ वर्षीय मुलाच्याही हातावर काच मारून जखमी केले. नंतर मायलेकाला घरात कोंडून टाकले. ही घटना सातारा परिसरातील राहुलनगरात रविवारी (२८ डिसेंबर) दुपारी घडली.

सुनिल अंबादास होगे पाटील (वय ३४, रा. राहुलनगर) असे सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या पतीचे नाव आहे. त्यांची पत्नी सीमा (वय २८, रा. राहुलनगर) यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. सीमा या ब्युटीपार्लरमध्ये नोकरी करतात. सुनील खासगी कंपनीत नोकरी करतात. तक्रारीत म्हटले आहे, की पती सतत घरगुती कारणावरून शिवीगाळ करून मारहाण करतात. चार वर्षांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद आहेत. रविवारी (२८ डिसेंबर) दुपारी २ च्या सुमारास त्या घरी असताना सुनिल यांनी तू माझे कपडे का धुतले नाही, असे म्हणून वाद घालून शिवीगाळ केली.

हाताचापटाने मारहाण केली. घरातील पार्लरचे सामान फोडून नुकसान केले. मिरची कुटण्याची मुसळी घेऊन त्यांच्या डोक्यात मारून जखमी केले. १४ वर्षांचा मुलगा भांडण सोडवण्यासाठी मध्ये आल्याने सुनील यांनी त्यालाही बाजूला पडलेली काच घेऊन हातावर मारून जखमी केले. पोलिसांत तक्रार करण्यासाठी जाऊ नये म्हणून घरात बंद कोंडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २९ डिसेंबरला सकाळी साडेदहाला दरवाजा उघडला व परत दोघांना शिवीगाळ केली. सीमा यांनी मुलासह सायंकाळी सातारा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी त्यांना घाटी रुग्णालयात पाठवले. अधिक तपास पोलीस अंमलदार तुकाराम सोनुने करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अवैध सावकारी गुंडांनी बांधकाम व्यावसायिकाचे जगणे केले अवघड, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अटक, ५ लाखांच्या बदल्यात १६ लाख गेले, अडीच एकर जमीन हडपली, ॲट्रॉसिटी, मुलाच्या अपहरणाच्या धमक्या..., छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक प्रकार उघड

Latest News

अवैध सावकारी गुंडांनी बांधकाम व्यावसायिकाचे जगणे केले अवघड, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अटक, ५ लाखांच्या बदल्यात १६ लाख गेले, अडीच एकर जमीन हडपली, ॲट्रॉसिटी, मुलाच्या अपहरणाच्या धमक्या..., छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक प्रकार उघड अवैध सावकारी गुंडांनी बांधकाम व्यावसायिकाचे जगणे केले अवघड, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अटक, ५ लाखांच्या बदल्यात १६ लाख गेले, अडीच एकर जमीन हडपली, ॲट्रॉसिटी, मुलाच्या अपहरणाच्या धमक्या..., छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक प्रकार उघड
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अवैध सावकारी गुंडांच्या टोळीकडून व्याजाने पैसे घेणे शहरातील बांधकाम व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले. १०...
टवाळखोरांनी हद्दच केली... शाळेबाहेरच दहावीतील विद्यार्थिनीची छेड, भावाने जाब विचारल्याने फायटरने केले रक्तबंबाळ!; वैजापूर तालुक्यातील खंडाळ्याची संतापजनक घटना
समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software