पती-पत्नी झोपले, घराला नव्हता दरवाजा, सकाळी उठून पाहिले अन्‌ धक्काच बसला... बीड बायपासची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दरवाजा नसलेल्या घरात घुसून मध्यरात्रीतून चोरट्याने १५ हजारांचा मोबाइल आणि ७ हजार ३०० रुपये रोख चोरून नेले. ही घटना आज, १८ नोव्हेंबर सकाळी बीड बायपासच्या एशियाड कॉलनीत समोर आली.

विशाल प्रभाकर सोनवणे (वय ४३, रा. एशियाड कॉलनी बीड बायपास, गुरू लॉन्सच्या बाजूला, मुकुंदवाडी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते पत्नी, मुलाबाळासह राहतात. ज्ञानेश्वर पवार यांच्या केसींग पाईपच्या गोदामावर वॉचमन आहेत. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पत्नी, मुलांसह जेवण करून घराला दरवाजा नसल्याने पडदा आडवा लावून ते झोपी गेले. मंगळवारी (१८ नोव्हेंबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास उशीजवळ ठेवलेला ओप्पो कंपनीचा मोबाइल त्यांना दिसून आला नाही. त्यांच्या पत्नीचे पाकिटातील ५ हजार ३०० रुपये आणि त्यांच्या जिन्स पॅन्टच्या खिशातील २ हजार रुपयेसुद्धा गायब होते. कोणीतरी उघड्या घराच्या दरवाजातून आत येत चोरी केल्याचे समोर आल्याने विशाल सोनवणे यांनी एकूण २२ हजार ३०० रुपयांच्या ऐवजाच्या चोरीची तक्रार मुकुंदवाडी पोलिसांत तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार नरसिंग पवार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!

Latest News

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!! शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बेगमपुरा पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार गणेश गायकवाड याने वरिष्ठांच्या नावे तब्बल १४ लाख रुपयांची...
आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक, नोकरी मागण्यासाठी आला होता...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software