- News
- सिटी क्राईम
- ड्रग्जमाफियांविरुद्ध शहर पोलिसांनी पुकारले युद्ध!; इंदौर, अहमदाबादवरून २ माफियांना मानगूट पकडून शह...
ड्रग्जमाफियांविरुद्ध शहर पोलिसांनी पुकारले युद्ध!; इंदौर, अहमदाबादवरून २ माफियांना मानगूट पकडून शहरात आणले!; १८ हजार नशेच्या बाटल्या जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : गुजरात, मध्यप्रदेशातून छत्रपती संभाजीनगरमध्ये नशेच्या औषधीचा पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. शहरात दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीतून परराज्यातील ड्रग्ज माफियांची नावे समोर आली. पोलिसांनी अहमदाबाद आणि इंदौरमध्ये छापे मारून दोन्ही माफियांच्या मुसक्या आवळल्या. धुळे व इंदौर येथील छाप्यात कोडीन सिरपच्या एकूण १८३६० बॉटल जप्त करण्यात आल्या.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार, सहायक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे, ज्ञानेश्वर अवघड, संजय बहुरे, विनायक शेळके, पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे, अर्जुन कदम, सहायक फौजदार दिलीप मोदी, पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड, अशरफ सय्यद, अमोल शिंदे, नवाब शेख, सागर पांढरे यांनी केली. कल्पेश अग्रवाल हा १०० टक्के अनुदानित खासगी शिक्षण संस्थेत शिपाई असून, तो मेव्हण्याची अलिशान कार तस्करीसाठी वापरत होता.
२५० गुन्हे, ४०० संशयितांना अटक, २ कोटींचा मुद्देमाल...
पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी पदभार घेतल्यापासून शहरात ड्रग्जविरोधी मोहीम हातात घेतली आहे. त्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना आणि गुन्हेशाखेला कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहे. स्वतंत्र अंमलीपदार्थ प्रतिबंधक पथकही स्थापन केले आहे. चालू वर्षात आतापर्यंत विविध पोलीस ठाणे, शहर गुन्हे शाखा व अंमलीपदार्थ प्रतिबंधक पथकाने एकूण २६० गुन्हे दाखल केले असून, त्यात ४०० संशयित अटक केले. त्यांच्याकडून २ कोटी ३७ लाख ५३ हजार ८४६ रुपयांचा गांजा, चरस, नशेसाठीच्या औषधी गोळ्या व सिरप असा मुद्देमाल जप्त केला आहे.

