लष्करी जवानाचे केस वाढलेले, पोलिसांना आला डाऊट..मग झाला बनाव उघड!;  कर्णपुरा मंदिरात घडला धक्कादायक प्रकार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : लष्करी जवानाचे केस वाढलेले पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटले. इंडियन आर्मी लिहिलेले जॅकेट, लष्कराची टोपी, बूट घालून जवान कर्णपुरा देवीच्या मंदिरात रांग सोडून घुसण्याचा प्रयत्‍न करू लागला. पोलिसांना संशय आला. त्यांनी त्‍याला पकडून कसून चौकशी सुरू केली तेव्हा त्‍याची त.. त.. प.. प... सुरू झाली.. तो चक्क बनावट लष्करी जवान निघाला. लष्करात जाण्याचे स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून पैठण तालुक्यातील सोमवाडीचा २१ वर्षीय लहू नामदेव राऊत असा तोतया जवान बनून फिरत होता... पण अति केलं अन्‌ फसला... ही घटना मंगळवारी (२३ सप्‍टेंबर) सायंकाळी पाचला घडली.

नक्की काय घडलं?
नवरात्रीनिमित्त कर्णपुरा देवीची यात्रा सुरू असल्याने मोठी गर्दी होत आहे. देवीच्या दर्शनासाठी मोठी रांग असते. शहर पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे. वेदांतनगरच्या ठाणेदार प्रविणा यादव, छावणीचे प्रभारी ठाणेदार डॉ. विवेक जाधव, पोलीस उपनिरीक्षक विनोद आबूज तैनात होते. त्याचवेळी लहू रांग सोडून थेट मंदिरात घुसू लागला. केस वाढलेले असल्याने पोलिसांना संशय आला. सुरुवातीला त्यांना ती महिलाच वाटली. दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक कांचन मिरधे, कल्पना खरात, सुनीता नागलोद, मोनिका दिवे, साक्षी चंद्रे यांनी लहूकडे धाव घेत थांबवले. गाभाऱ्यात जाऊन पूजा करण्याचा हट्ट करत त्याने पोलिसांना अरेरावी केली.

होता पुरुष, सांगत होता मयुरी...
पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांनी आयकार्डची मागणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. स्वतःला तो मयुरी अनिल शिंदे असे नाव सांगत होता. उत्तराखंडमध्ये कर्तव्यावर असल्याचे सांगून २०२३ ला खडकवासला येथे प्रशिक्षण घेतल्याचेही त्याने ठोकून दिले. मात्र त्यामुळे संशय अधिकच बळावला. त्याने जम्मू कश्मिरमध्ये कार्यरत असलेल्या सुभेदाराचा मोबाइल क्रमांक दिला. त्यांना पोलिसांनी कॉल लावून विचारले असता त्याची मनमाड रेल्वेस्थानकावर ओळख झाल्याचे सांगून लष्कराबाबत माहिती नसल्याचे या सुभेदाराने सांगितले.

लहू शेतकरी कुटुंबातील, जवान व्हायचे होते स्वप्न
पोलिसांनी लहूला पकडून ठेवण्याचा प्रयत्‍न केला. मात्र तो पळू लागला. मग त्‍याला छावणी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि कसून चौकशी करण्यात आली. लहू शेतकरी कुटुंबातील असून, त्‍याला लष्करात जाण्याचे स्वप्न होते. काही वेळा प्रयत्नही केला. मात्र, यश आले नाही. मग त्‍याने जवानाचे सर्व साहित्य विकत घेतले अन्‌ गावात जवान बनून फिरू लागला. त्याच्याविरुद्ध दामिनी पथकाच्या अंमलदार अनिता संपत शिंदे (वय ५७) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे छावणीचे ठाणेदार डॉ. विवेक जाधव यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software