सुसाट कारने दुचाकीस्वाराला उडवले, कामाक्षी चौकातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सुसाट कारने दुचाकीस्वार फळविक्रेत्याला उडवले. यात फळविक्रेता जखमी झाला आहे. त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात सिटी चौक पोलिसांनी कारचालकाविरुद्ध रविवारी (३० नोव्‍हेंबर) गुन्हा दाखल केला आहे.

सलाउ‌द्दीन महेमूद बागवान (वय ४२, रा. सब्जीमंडी, पैठण गेट) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते बसस्थानकाच्या बाजूला गरमपाणी रोडवर फळाची हातगाडी लावून फळविक्रीचा व्यवसाय करतात. २२ नोव्‍हेंबरला सकाळी नेहमीप्रमाणे फळ माल आणण्यासाठी ते जाधवमंडी नवीन मोंढा येथे जाण्यासाठी सब्जीमंडी येथून सुमारे पावणेसहाला मोटारसायकलीने  निघाले. पैठण गेट ते सिटीचौक, किले अर्क मार्गे नवीन मोंढा जाधववाडी येथे जात असताना कामाक्षीचौकात पांढऱ्या स्विप्ट कारने (MH20 CH4782) त्यांना उडवले. कार बुढीलेनकडून सुसाट आली होती. सलाउद्दीन जखमी झाले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना बाजूला घेत त्यांचा मुलगा कबीरला कॉल केला. कबीरने येऊन सलाउद्दीन यांना रिक्षाने एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पाय फ्रॅक्चर झाल्याने डॉक्टरांनी शस्‍त्रक्रिया केली. अधिक तपास पोलीस अंमलदार नागोराव घुगे करत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software