थेट पोलीस आयुक्‍तांच्या टीमचे वाळूज MIDC त छापे; दारूचे २ साठे जप्त, तिघांच्या मुसक्या आवळल्या

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

WhatsAppImage2025-10-11at11.04.30AMछत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अवैध दारू विक्रीवर अखेर पोलीस आयुक्‍तांच्या पथकाला कारवाई करावी लागली. पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथकाला कामगिरीवर पाठवले. या पथकाने दोन ठिकाणी छापे मारून तिघांना अटक केली आहे. त्‍यांच्याकडून ९३ हजार ३९५ रुपयांची दारू जप्त केली. त्‍यामुळे वाळूज एमआयडीसीत कसा अवैध दारूचा महापूर वाहतो, हेच दिसून आले आहे.

अवैध धंदे आणि दारू विक्रीविरुद्ध पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार यांनी ठाम भूमिका घेतली आहे. शहरात अवैधपणे दारू विक्री करणाऱ्यांची सखोल माहिती काढून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी त्यांनी आपल्या विशेष पथकाला आदेश दिले आहेत. गुरुवारी (९ ऑक्‍टोबर) या विशेष पथकाने कमळापूर येथे धडक दिली. रोहित नेत्रपाल नांगल व राजा जालिंदर यांच्या ठिकाणांवर छापे मारले. त्‍यांच्याकडे देशी व इंग्रजी बनावटीच्या एकूण ७३१ बाटल्या व रोख रक्कम असा एकूण ४७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जोगेश्वरीत अभिषेक कुमार नावाचा व्यक्‍ती अवैध दारू विक्री करत असल्याचे कळताच पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्‍या. त्‍याच्याकडून १४२ बाटल्या व रोख रक्कम असा एकूण ४५ हजार ७१५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तिघांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्तांनी स्थापन केलेल्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कदम, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत चिखलीकर व पथकातील अंमलदारांनी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश, निवडणुकीत मतदारांना धमकावल्याचा आरोप

Latest News

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश, निवडणुकीत मतदारांना धमकावल्याचा आरोप आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश, निवडणुकीत मतदारांना धमकावल्याचा आरोप
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software