धक्कादायक : २९ जणांनी बनावट-अर्धवट कागदपत्रे सादर करून मिळवले जन्मप्रमाणपत्र!; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बनावट, अर्धवट कागदपत्रे सादर करून २९ जणांनी जन्मप्रमाणपत्र मिळवल्याचे समोर आल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी पडताळणी केली असता ही बाब समोर आली. सिटी चौक पोलीस ठाण्यात या २९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांच्याआधी उप विभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे होते. जन्म- मृत्यू तारखेपासून १ वर्षानंतरच्या विलंबाने प्राप्त झालेल्या प्रकरणांत जन्म-मृत्यूची नोंद करण्याबाबत अनुषंगिक कार्यवाही आदेश देण्याबाबत जिल्हादंडाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत केले आहे. जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी दिलेल्या आदेश प्रकरणांचे पुनःनिरीक्षण करण्यात आले असता २९ जणांनी त्यांच्या आधार कार्डवरील जन्म तारखेशी विसंगत असलेले, जन्माबाबत ठोस पुरावा नसलेले कागदपत्रे सादर करून जन्मप्रमाणपत्र मिळवल्याचे स्पष्ट झाले.

या काळात झाला घोळ
११ ऑगस्ट २०२३ ते ७ एप्रिल २०२५ या काळात २९ जणांनी विलंबाचे जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज दिले. या अर्जात जाणीवपूर्वक खोट्या जन्मतारखा, खोटे जन्मस्थळ, खोटे शपथपत्र देऊन व जन्माचे खोटे पुरावे दाखल केले. जाणीवपूर्वक अर्धवट कागदपत्र जोडून शासनाची दिशाभूल करून विलंबाचे जन्म प्रमाणपत्र आदेश मिळवून त्यानंतर संबंधित ग्रामपंचायत व महानगरपालिका वॉर्डातून विलंबाचे जन्म प्रमाणपत्र प्राप्त करून शासनाची फसवणूक केली.

हे आहे ते २९ जण
संजय रामचंद्र गवळी (रा. अयोध्यानगर, सिडको, छत्रपती संभाजीनगर), हबीब अहेमद शेख (रा. सहजापूर ता. छत्रपती संभाजीनगर), नैना शांतीलाल हनवते (रा. संजयनगर, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर), धरमसिंग श्रावणसिंग ब्रह्मणावत (रा. महालपिंप्री ता. छत्रपती संभाजीनगर), संजय उत्तमआप्पा लकडे (रा. चौका ता. छत्रपती संभाजीनगर), तुळशीराम दादासाहेब कोरडे (रा. गाढेजळगाव ता. छत्रपती संभाजीनगर), रियाज नानू सय्यद (रा. फातेमानगर, सावंगी ता. छत्रपती संभाजीनगर), शेख असलम शेख गणी (रा. नायगाव, भिकापूर ता. छत्रपती संभाजीनगर), शेख रफीक शेख मेहबूब (रा. नायगाव भिकापूर, ता. छत्रपती संभाजीनगर), रिजवाना शेख गफूर (रा. गाढेजळगाव ता. छत्रपती संभाजीनगर), श्रीधर पुंजाराम टारपे (रा. संभाजी कॉलनी, एन ६ सिडको, छत्रपती संभाजीनगर), संतोष सांडू दाभाडे (रा. कौडगाव पो. गोलटगाव, ता. छत्रपती संभाजीनगर), स्वप्निल दशरथ दोंदे (रा. पंढरपूर, ता. छत्रपती संभाजीनगर), अब्दुल जब्बार हाजी मोहम्मद गौस (रा. पिंप्री राजा खुर्द ता. छत्रपती संभाजीनगर), अबुजर रज्जाक पठाण रा. सहजापूर ता. छत्रपती संभाजीनगर), राजू आबाजी जोंधळे (रा. मिलींदनगर, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर), रेहाना बेगम शेख इद्रीस (रा. मक्का मशिदीजवळ, किराडपुरा, छत्रपती संभाजीनगर), अजिमुद्दीन काझी अब्दुल बारी (रा. रोशन मस्जिदजवळ, शरीफ कॉलनी, किराडपुरा, छत्रपती संभाजीनगर), मानसी सुधाकर शिंदे (रा. हनुमान नगर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर), शेख चांद शेख मकबुल (रा. रोशन मस्जिदजवळ, शरीफ कॉलनी, किराडपुरा, छत्रपती संभाजीनगर), शेख माजेद शेख ईसाक (रा. नायगाव, ता. छत्रपती संभाजीनगर), मोहम्मद आरिफ सत्तार खान (रा. नायगाव, ता. छत्रपती संभाजीनगर), सुभाष सखाराम लोखंडे (रा. ब्रिजवाडी, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर), फरजाना सय्यद रशीद (रा. फाजलपुरा, काचीवाडा, छत्रपती संभाजीनगर), आशुलाल रब्बानी कुरैशी (रा. शेंद्राबन, पो. वरुड काझी ता. छत्रपती संभाजीनगर), अफसर नवाब शेख (रा. अंबरहिल जटवाडा रोड, हर्सूल ता. छत्रपती संभाजीनगर), विनोद सुभाष तायडे (रा. रमानगर, छत्रपती संभाजीनगर), ज्योती अशोक भिसे (रा. रमानगर, छत्रपती संभाजीनगर), सुकराबी शेख सत्तार (रा. हर्षनगर, छत्रपती संभाजीनगर).

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Latest News

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढत, धक्काबुक्की करून युवकाने तिची सोन्याची पोत घेऊन पळ...
कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software