- News
- सिटी क्राईम
- वाळूज MIDC त पोलिसांचा धाक गेला कुठे? : रस्त्यात कार उभी करून मद्यधुंद तरुण अर्धा तास रंगला रील, स...
वाळूज MIDC त पोलिसांचा धाक गेला कुठे? : रस्त्यात कार उभी करून मद्यधुंद तरुण अर्धा तास रंगला रील, सेल्फी शूटमध्ये, वैतागलेल्या वाहनधारकांनी राँगसाईडने गाड्या नेल्या...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : अवघे शहर पोलीस एकीकडे गुन्हेगारी आणि गुन्हेगारीबद्दल सक्त झाले असताना, शहर पोलिसांचाच एक भाग असलेले वाळूज एमआयडीसी पोलीस मात्र गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात सपशेल अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. वाळूज एमआयडीसीतील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी मरगळ झटकून कामाला लागण्याची गरज व्यक्त होत आहे. आज, १४ सप्टेंबरला एका नशेखोराने जे केले, ते धक्कादायक आहे.
वाळूज एमआयडीसीतील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती दुर्दैवी झाली आहे. गुन्हेगार, टवाळखोर, नशेखोरांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. वारंवार उद्योजकांनी यावर आवाजही उठवला आहे. पण आश्वासनांच्या पलिकडे त्यांना काही दिलासा मिळालेला नाही. थोडाही वाद झाला, की नशेखोर चाकू काढतात. रस्त्यातच हाणामारी सुरू करतात. त्यामुळे कामगार वर्ग धास्तावला आहे. तरुणाने बिनदिक्कत रस्त्यात कार उभी करून अर्धा तास वाहतूक कोंडी केली. पण एकाही नागरिकाने हटकण्याची तसदी घेतली नाही. कारण पुढे काय होईल, याची कल्पना करूनच त्यांच्या अंगावर काटा आलेला असतो. शहरात ज्या पद्धतीने पोलीस आयुक्तांनी पोलिसांचा दरारा गुन्हेगारांवर बसवायला सुरुवात केली आहे. त्याचपद्धतीने वाळूज एमआयडीसीकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी उद्योजक, कामगार वर्गातून होत आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या!
By City News Desk
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!; महसूल मंत्र्यांची घोषणा
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 12:15:35
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार तथा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी...

