सातारा देवळाई रोडवरील रॉयल सुपर मार्केट फोडले; ४ लाखांचे ड्रायफ्रूट गेले चोरीला!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सातारा देवळाई रोडवरील रॉयल सुपर मार्केट चोरट्यांनी फोडून ३ लाख ९० हजार रुपयांचे ड्रायफ्रूट चोरून नेले आहेत. ही घटना सोमवारी (१ सप्‍टेंबर) सकाळी समोर आली. सातारा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोहम्मद जाकीर ठेकीया (वय ४१, रा. हुसैन कॉलनी, गारखेडा परिसर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्‍यांचे देवळाई रोड, कौसर पार्कजवळ रॉयल सुपरमार्केट हे किराणा दुकान आहे. रविवारी (३१ ऑगस्ट) रात्री साडेदहाला त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. सोमवारी (१ ऑगस्ट) सकाळी सहाला दुकानाच्या बाजूला चहाची हॉटेल चालवणाऱ्या अतिक पटेल (रा. देवळाई गाव) यांनी कॉल करून ठेकीया यांना सांगितले, की तुमच्या दुकानाचे अर्धे शटर उचकटलेले आहे. लगेचच ठेकीया हे दुकानाजवळ आले. त्यांनी सातारा पोलिसांनाही कळवले.

दुकानात जाऊन बघितले असता दुकानात ठेवलेले सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरट्यांनी गल्ल्यात ठेवलेले पैसे व किराणा सामानाची चोरी केली. यात गल्ल्यातील १५ हजार रुपये रोखसह २१ हजारांचे बदाम, ६० हजारांचे काजू, ५५ हजारांचे अंजीर, ६० हजार ७५० रुपयांचे पिस्ता, ३६ हजार रुपयांच्या लुज बदामाच्या दोन गोण्या, २४ हजारांचे मखाना, ३० हजारांचे मनुके, १२ हजारांचे अक्रोड मगज, २३ हजार ७५० रुपयांचे काजूचे पाच डब्बे, १५ हजार ५० रुपयांचे काळे मनुके, ३७ हजार ५०० रुपयांचे खजूर असा एकूण ३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे समोर आले. घटनास्‍थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी पाहणी केली. चोरांची टोळी कारमधून आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्‍यांनी मोठ्या आकाराच्या पहारीने (रॉड) मधोमध शटर उचकटवले. त्याआधी रेकीही केली होती. अधिक तपास पोलीस अंमलदार दिगंबर राठोड करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software