- News
- सिटी क्राईम
- प्रेम, शरीरसंबंध अन् ब्रेकअप!; २१ वर्षीय तरुणी आत्महत्येला निघाली, पोलिसांनी वाचवले, प्रियकराविरु...
प्रेम, शरीरसंबंध अन् ब्रेकअप!; २१ वर्षीय तरुणी आत्महत्येला निघाली, पोलिसांनी वाचवले, प्रियकराविरुद्ध केला बलात्काराचा गुन्हा दाखल
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : २१ वर्षीय तरुणीवर जाळे फेकले, लग्नाच्या आमिषाने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. नंतर तू कोण, मी कोण, असा पवित्रा घेत तिच्या संपर्क तोडला. त्यामुळे तरुणी नैराश्यात गेली... आता माझ्यासाठी सर्व काही संपलं, असं म्हणत आत्महत्येसाठी निघाली... पोलिसांनी तिला अडवून समजूत काढली. ही घटना बुधवारी (१७ सप्टेंबर) सकाळी घडली. रात्री पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात प्रियकर प्रशांत मनोज राठोड (२१, रा. गणेशनगर, गारखेडा) याच्याविरुद्ध तरुणीच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
बुधवारी दुपारी ती अनवाणी रस्त्याने रडतच जात होती. ही बाब शिवसेना शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे यांच्या लक्षात आली. त्यांनी तिला थांबवले. दामिनी पथकाला कळवले. पोलीस उपनिरीक्षक कांचन मिरधे, सहायक पोलीस उपनिरीक्षक लता जाधव, पोलीस अंमलदार साक्षी चंद्रे, कविता गवळी यांनी तिथे लगेचच येत तरुणीची विचारपूस केली. तिची समजूत काढून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नेले. या वेळी ती पोलिसांना सातत्याने मला मरायचे आहे, माझं सगळं संपलं... असे म्हणत होती. पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे, पोलीस उपनिरीक्षक रेशीम कोळेकर यांनी तिची समजूत काढली. त्यानंतर तरुणीच्या तक्रारीवरून प्रशांतविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास केला जात आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
By City News Desk
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
By City News Desk
Latest News
12 Mar 2026 11:12:00
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...

