दोन पोलिसांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!; तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन विवाहितेने आत्‍महत्‍या केल्याचे प्रकरण, दीड लाखासाठी छळत होते, चारित्र्यावर संशय घेत होते..., छ. संभाजीनगरची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मिलकॉर्नर परिसरातील पोलीस वसाहतीतील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून २५ वर्षीय विवाहितेने उडी घेऊन आत्महत्या केली. हुंड्याच्या उरलेल्या दीड लाख रुपयांसाठी तिचा पती आणि सासरच्यांकडून छळ सुरू होता. पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करून मारहाण करत होता. छळ असह्य झाल्याने तिने टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवले. ही घटना गुरुवारी (२ सप्टेंबर) दुपारी १२ च्या सुमारास समोर आली. बेगमपुरा पोलिसांनी या प्रकरणात आज, ३ सप्टेंबरला तिच्या पोलीस असलेल्या पती आणि जेठसह दीर, सासू अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सबाचा भाऊ राज अकील शेख (वय २४, रा. कसबे सुकेने, ता. निफाड, जि. नाशिक) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो आईसोबत राहतो. त्याचे वडील अकील २०१९ मध्ये वारले आहेत. तो चिकन शॉपवर काम करतो. सबा त्याची मोठी बहीण होती. तिचे लग्न पोलीस अंमलदार समीर मुस्ताक शेख (वय ३५, रा. बसस्थानकाजवळ ता. कन्नड, ह. मु. पोलीस वसाहत, मिलकॉर्नर छत्रपती संभाजीनगर) याच्यासोबत १५ जुलै २०२१ रोजी झाले होते. लग्नावेळी समीरला ५० हजार रुपये हुंडा दिला होता. हुंड्याचे उरलेले २ लाख रुपये नंतर देण्याचे ठरले होते.

सबा ही पती समीर, सासू सलमा मुस्ताक शेख (वय ५०), दीर शाहरुख शेख (वय २८) यांच्यासह पोलीस वसाहतीत राहत होती. समीरचे मोठे भाऊ फारुख शेख (वय ४०), हे पोलीस वसाहतीतच कुटुंबासह राहतात. आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने हुंड्याचे उरलेले दीड लाख रुपये राज हा समीरला देऊ शकला नाही. लग्नानंतर दोन ते तीन महिने सबाला सासरच्यांनी चांगले वागवले. नंतर सबा माहेरी आली असता तिने सांगितले, की पती दीड लाख रुपये न दिल्याने शिवीगाळ करून मारहाण करतात. सासू, दीर आणि जेठ हेही शिवीगाळ करतात. पतीस एकाचे दोन सांगून शिवीगाळ व मारहाण करण्यास सांगतात. नंतरच्या काळातही सबाने वेळोवेळी माहेरी होणाऱ्या छळाबद्दल आईला सांगितले होते. 

२०२४ मध्ये पुन्हा छळ सुरू...
सन २०२२ मध्ये सबा आणि समीरमध्ये जास्तच भांडण झाल्याने तिच्या आईने तिला माहेरी आणले होते. त्यानंतर ८ दिवसांनी इतर नातेवाइकांनी समीरकडे जात बैठक घेतली. तेव्हापासून ते चांगले राहत होते. सन २०२४ मध्ये मार्च महिन्यात सबा आणि समीर यांच्यात पुन्हा भांडणे होऊ लागली. पती समीर लग्नावेळी ठरलेले दीड लाख रुपये न दिल्याच्या कारणावरून व चारित्र्यावर संशय घेऊन सबाला शिवीगाळ करून मारहाण करायचा. त्याची आई व दोन्ही भाऊसुध्दा शिवीगाळ करून त्रास देतात, असे सबाने आईला सांगितले.

२ ऑक्टोबरला उचलले टोकाचे पाऊल
गुरुवारी (२ ऑक्‍टोबर) सकाळी साडेनऊला सबाने आईला कॉल करून सांगितले, की पती समीर माझ्यासोबत एक महिन्यापासून बोलत नाहीत. मोठ्या काकांना पाठवून त्यांना समजव. त्यानंतर तिने कॉल कट केला. त्यानंतर साडेअकरा ते साडेबाराच्या सुमारास समीरने तिच्या माहेरी कॉल करून सांगितले की, तुम्ही लवकर या. सबाला चक्कर आली आहे. त्यामुळे सबाची आई, भाऊ, काका असे छत्रपती संभाजीनगरला आले. त्यांना समीरने मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये बोलावले. तिथे गेल्यावर समीरने सांगितले की, सबा घरातील गॅलरीतून खाली पडून मरण पावली आहे. सबाच्या दाढीखाली जखम झालेली दिसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software