शारीरिक संबंधाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, २४ वर्षीय प्रेयसीची प्रियकराविरुद्ध पोलिसांत धाव..., मुकुंदवाडीतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : २४ वर्षीय प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवताना फोटो, व्हिडीओ काढले. नंतर हे फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकराने खंडणी मागितल्याची तक्रार तरुणीने मुकुंदवाडी पोलिसांत केली आहे. त्‍यावरून पोलिसांनी सोमवारी (८ ऑक्‍टोबर) प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रामेश्वर पिंपळे (रा. मुकुंदवाडी) असे प्रियकराचे नाव आहे. दोघेही मुकुंदवाडीत राहतात. तरुणीने तक्रारीत म्‍हटले आहे, की रामेश्वरसोबत तिने स्वखुशीने शारीरिक संबंध ठेवले. या संबंधाचे फोटो आणि व्हिडीओ त्यांनी काढले होते. मात्र नंतर रामेश्वर लग्न कर म्हणून तिच्या मागेच लागला. यातून दोघांत भांडण झाले. त्याने तिचा मोबाइल हिसकावून घेतला. माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर ७० हजार रुपये दे. नाही तर तुझे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करेल, अशी धमकी त्याने तरुणीला दिली. अधिक तपास केला जात आहे.

लाचेच्या गुन्ह्यात मुकुंदवाडीच्या पोलीस उपनिरीक्षक राऊत यांना पोलीस कोठडी
शस्‍त्र बाळगल्याच्या गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच घेणारे मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष वसंत राऊत (वय ४३, रा. मोरया पार्क २, हर्सूल) यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. पवार यांनी गुरुवारपर्यंत (९ ऑक्‍टोबर) पोलीस कोठडी सुनावली. ७ ऑक्‍टोबरला राऊत हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले होते. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात त्‍यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यांचा मोबाइल फोन जप्त करून विश्लेषण सुरू आहे. घराची झडतीदेखील घेण्यात आली. मात्र विशेष काही हाती लागले नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software