- News
- सिटी क्राईम
- पडेगावच्या कल्पनाचे प्रकरण फसवणूक करण्यापर्यंतच मर्यादित?
पडेगावच्या कल्पनाचे प्रकरण फसवणूक करण्यापर्यंतच मर्यादित?
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कल्पना भागवतचे प्रकरण सध्या तरी आयएएस अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करण्यापर्यंतच मर्यादित असल्याचे समोर येत आहे. तिने पैसे उकळलेल्या व्यक्तींना आता पोलीस गुन्ह्यात साक्षीदार करण्याची शक्यता आहे. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने आज, ६ डिसेंबरला दुपारी तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येईल.
कल्पना भागवत ६ महिन्यांपासून जालना रोडवरील ॲम्बेसेडर या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामी थांबल्याची गोपनीय माहिती सिडको पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी हर्सूलच्या पोलीस निरीक्षक स्वाती केदार, सहायक पोलीस निरीक्षक अरुणा घुले, वर्षा काळे यांच्यासह हॉटेलमध्ये जाऊन २२ नोव्हेंबरला कल्पनाला अटक केली. तिच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यातील अंमलदार सतीश बोर्डे यांनी तक्रार दिली आहे. कल्पनाने हॉटेलमध्ये थांबण्यासाठी जे आधारकार्ड दिले होते, त्यावर खाडाखोड केल्याचे दिसून आले होते. तिच्याकडे केंद्रीय लोकसेवा आयोगातील २०१७ ची यादीही तिच्याकडे मिळाली होती. ही यादीही बनावट असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणात कल्पनासह तिचा अफगाणी प्रियकर मोहम्मद अशरफ गिल (वय २४, ह. मु. जंगपुरा, नवी दिल्ली) व केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ओएसडींच्या नावाचा वापर करणारा तोतया अधिकारी डिम्पी देवेंद्रकुमार हरजाई (वय ३०, रा. पालम, दिल्ली) यांना अटक करण्यात आली आहे. अशरफचा भाऊ पाकिस्तानमध्ये राहतो. त्याला कल्पना आणि डिम्पीच्या मदतीने भारतात घुसखोरी करायची होती, असे चौकशी समोर आले होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
By City News Desk
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
By City News Desk
Latest News
12 Mar 2026 20:36:06
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...

