ओव्हरगाव मर्डर केस : मारेकऱ्यांच्या दुकानांवर ग्रामपंचायतीने घातला बुलडोझर!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांडू पठाण (वय ६८) यांची हत्या करणाऱ्या क्रूरकर्म्यांची दोन्ही दुकाने मंगळवारी (२३ डिसेंबर) सायंकाळी जमीनदोस्त करण्यात आली. ग्रामस्थांनी एकत्र येऊन बैठक घेत ग्रामपंचायतीचा प्रस्ताव मंजूर केला आणि त्यानंतर लगेचच ग्रामपंचायतीने बुलडोझर दुकानांवर चालवला.

हत्या करणाऱ्या इम्रान खान मोईन खान पठाण, अफरोज खान गयाज खान पठाण, समीर खान जमीर खान पठाण, उमेर खान जमीर खान पठाण, मोईन इनायत खान, जमीर इनायत खान पठाण, मोईन इनायत खान पठाण, फुरकान अजगर पठाण, असलम खान ऊर्फ गुड्डू गयाज खान पठाण (सर्व रा. ओव्हरगाव) यांना यांना हर्सूल पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयाने २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

अशी केली होती हत्या...
छत्रपती संभाजीनगर शहरातील जटवाडा रोडवरील ओव्हरगावमध्ये माजी सरपंच दादा सांडू पठाण (वय ६८) यांची ११ गावगुंडांनी घेरून १७ डिसेंबरला दुपारी निर्घृण हत्या केली होती. घरासमोरच पठाण कुटुंबीयांची शेती आहे. घरापासून काही अंतरावर शाळेजवळील गट नं. १९८ मध्ये त्यांची साडेचार एकर जमीन आहे. याच जमिनीवरून मारेकरी आणि पठाण कुटुंबात १९९६ पासून वाद आहे. जमिनीच्या शेजारून एक वाट जाते. सुरुवातीला मारेकऱ्यांनी या छोट्या वाटेवरून वाद सुरू केला होता. नंतरच्या काळात थेट पूर्ण जमिनीवरच दावा केला. या जमिनीचा कायदेशीर ताबा दादा पठाण यांच्याकडे आहे. १७ डिसेंबरला दुपारी पावणेबाराच्या सुमारास पठाण यांनी या जमिनीच्या सपाटीकरण करण्यासाठी जेसीबी बोलावला होता. त्यावरून ११ जणांनी लाठ्याकाठ्या, रॉड, धारदार शस्त्रांनी दादा पठाण यांची हत्या केली होती. मारेकऱ्यांनी पठाण यांची मुले मुले अफसर (वय ४०), जुबेर (वय ३८), नातू जुनेद मोईन पठाण, माजेद मोईन पठाण (वय १७), मुलगी तसलीम जावेद पठाण, सून तसलीम अफसर पठाण यांच्यावरही हल्ला चढवला होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा... छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
तुझ्यामुळेच पराभूत झालो म्हणत भाजप उमेदवाराच्या घरावर टोळक्याचा सशस्‍त्र हल्ला!, क्रांती चौक भागातील गांधीनगरातील मध्यरात्रीचा थरार
विकास जैन यांनी ACP देशमुख यांचा गळा पकडून मागे ढकलले, बाकीच्यांनी हल्ला केला, म्हणून पोलिसांनी लाठीमार केला!; जैन, राजपूत, जीवनवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, शासकीय अभियांत्रिकी महावि‌द्यालयाच्या मतमोजणी केंद्रावरील दुसरी बाजू आली समोर 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software