मंगळसूत्र चोर ‘ब्रेक के बाद’ कामगिरीवर... सिडको एन १ मध्ये महिलेचे १ लाखाचे शार्ट गंठण हिसकावून ठोकली धूम!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मंगळसूत्र चोरांनी शहरात पुन्हा डोके वर काढले आहे. सिडको एन १ मध्ये मॉर्निंग वॉकहून परतणाऱ्या आजीबाईचे १ लाख रुपयांचे शॉर्ट गंठण हिसकावून दुचाकीस्वार दोन चोरट्यांनी पळ काढला. ही घटना मंगळवारी (७ ऑक्‍टोबर) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

सुरेखा विठ्ठल कुलकर्णी (वय ६०, रा. विजयश्री कॉलनी सिडको एन ५) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या कुटुंबासह राहतात. त्यांचा मुलगा श्रीनिवास विठ्ठल कुलकर्णी हे खासगी नोकरी करतात. मंगळवारी नेहमीप्रमाणे राहत्या घरून सकाळी ८ ला आजी मॉर्निंग वॉकसाठी निघाल्या. सिडको एन १ काळा गणपती मंदिरामागील पार्कमध्ये एक तास वॉकिंग करून सकाळी साडेनऊच्या सुमारास पार्कमधून बाहेर पडल्या. त्यानंतर एन १ कॉलनीतून जळगाव रोडकडे जाणाऱ्या रोडवर रेणुका बंगल्याच्या कोपऱ्यावर झाडाखाली आल्या असता अचानक मागून एका मोटरसायकलीवर दोघे चोर आले.

ते आजीच्या पुढे गेले व परत वळण घेऊन येत त्यांनी काही कळण्याच्या आतच मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दोन तोळ्यांचे शॉर्ट गंठन ओढून चोरून घेऊन गेले. आजीने आरडा ओरड केली असता तेथे लोक जमा झाले. मात्र तोपर्यंत चोर पळून गेले होते. दोघांचेही वय २५ असावे. त्यांनी तोंडाला काळा रुमाल बांधलेला होता. मोटारसायकल चालवणाऱ्याने अंगात काळा शर्ट व निळी जिन्स घातलेली होती तर मागे बसलेल्याने काळा शर्ट व निळी जिन्स घातलेली होती. दोघे सडपातळ होते. त्यांनी चोरलेले शॉर्ट गंठण २० ग्रॅमचे (किंमत १ लाख रुपये) होते. अधिक तपास पोलीस अंमलदार रमेश तांबोरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software