मोठी कारवाई : वाळूजमध्ये लॉजिस्टिक कंपनीवर छापा मारून नशेच्या औषधांच्या अडीच हजार बाटल्या जप्त!, चौघांना अटक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार यांच्या नेतृत्वात वाळूजच्या शिवराई भागातील व्हीआएल लॉजिस्टिक कंपनीवर शुक्रवारी (१२ सप्‍टेंबर) रात्री उशिरा छापा मारून ड्रग्‍ज रॅकेटचा पर्दाफाश केला. तस्कर रूपेश पाटील, अवी पाटील (दोघे रा. चाळीसगाव) हे एमआर असून, दोन वर्षांपूर्वी त्‍यांचे मेडिकल बंद पडल्यानंतर त्‍यांनी हा नशेच्या औषधांचा गोरखधंदा मांडला. कानपूर (उत्तरप्रदेश) येथून बाटल्या मागवून छत्रपती संभाजीनगरमार्गे नाशिक, मालेगावला पाठवायचे. छाप्यात पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्‍या.

पोलिसांनी जप्त केलेली नशेची औषधी ही कोडीन फॉस्फेट असून, ती मॉर्फिनसदृश औषध आहे. वेदना कमी करण्यासाठी, अतिप्रमाणातला खोकला नियंत्रणात आणण्यासाठी वापरली जाते. ही औषधी घेतल्याने झोप, नशा येते. तिची विक्री प्रिस्क्रिप्शनशिवाय बेकायदेशीर आहे. तिचे व्यसन लागते. १७५ मूळ किंमत असलेली ही औषधी बाटली नशेखोरांना चक्क ४०० रुपयांना मिळायची. रूपेश पाटील, अवी पाटील हे आधीच्या ओळखीवर नशेच्या औषधांची ऑर्डर देत होते.

उत्तरप्रदेशमधून औषध मागवून काही माल स्थानिक विक्रेत्यांना देत, उर्वरित नाशिक, मालेगावला पाठवायचे. दोघांपैकी एका भावाला गोडावूनमधून पकडले, दुसऱ्याला अटक करण्यासाठी विशेष पथक नाशिकला रवाना झाले. छत्रपती संभाजीनगर शहरातील रहिवासी ३ पेडलरना अटक करण्यात आली. व्हीआरएल लॉजिस्टिकच्या माध्यमातून ही तस्करी केली जायची. कंपनीच्या गोदामात २५०४ बाटल्यांची २० खोकी सापडली.

पोलीस आयुक्‍तांनी केली कारवाई...
नशेच्या औषधांचे मोठे पार्सल छत्रपती संभाजीनगरात आले असून, या बाटल्या घेऊन जाण्यासाठी नाशिकहून तरुण येणार असल्याचे पोलिसांना कळले. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक गीता बागवडे, सहायक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे, पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांनी गोदामावर छापा मारला. कारवाईत गडबड होऊ नये म्हणून पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोबाइल बंद करून ठेवण्यात आले होते. पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार यांनी स्वतःच्या मोबाइलमध्ये जप्त मुद्देमालाचे फोटो काढले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!

Latest News

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!! शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बेगमपुरा पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार गणेश गायकवाड याने वरिष्ठांच्या नावे तब्बल १४ लाख रुपयांची...
आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक, नोकरी मागण्यासाठी आला होता...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software