ॲम्बेसेडर हॉटेलमध्ये ६ महिने राहणाऱ्या कल्पनाने पाकिस्तानला हवालामार्फत पाठवले ३ लाख!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तोतया आयएएस अधिकारी कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय ४५, रा. चिनारगार्डन, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर), तिचा अफगाणी प्रियकर मोहम्मद अशरफ गिल (वय २४, ह. मु. जंगपुरा, नवी दिल्ली), साथीदार दत्तात्रय पांडुरंग शेटे (वय ३८, रा. मांडवगण, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर ) व डिम्पी देवेंद्रकुमार हरजाई (वय ३०, रा. पालम, दिल्ली) हे सर्व आता पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत गेले आहेत. २० दिवसांच्या तपासात राष्ट्रीय सुरक्षेला धोक्यापासून आर्थिक फसवणुकीपर्यंत हे प्रकरण येऊन थांबले. आधी कल्पना आणि नंतर आता तिचे साथीदारही न्यायालयीन कोठडीत गेल्याने या प्रकरणाची चौकशी आता पूर्ण झाल्याचे मानले जात आहे. शेवटपर्यंत देशविघातक कृत्याचे पुरावे पोलिसांना मिळाले नाहीत.

शुक्रवारी न्यायालयाने अशरफ, डिम्पी आणि दत्तात्रयची रवानगी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. आयएएस अधिकारी असल्याचे भासवून कल्पनाने अनेकांना गंडवले आहे. ज्यांना गंडवले त्यांना या प्रकरणात साक्षीदार करण्यात आले असून, त्यांची चौकशी पोलिसांनी करून जबाब नोंदवले आहेत. लवकरच दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले. कल्पना आणि तिच्या साथीदारांनी २८ हून अधिक लोकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. कायद्याच्या कचाट्यात सापडू नयेत म्हणून अनेकांनी पोलिसांकडे सोयीचे जबाब नोंदवल्याचे चित्र आहे. तपासाची सखोल माहितीही पत्रकारांना देण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली असून, ज्या २८ जणांना नोटीस बजावली होती, त्यातील किती लोकांचे जबाब नोंदवले, ते जबाबात काय म्हणाले, हे आता न्यायालयातच समोर येणार आहे. विशेष म्हणजे २८ पैकी बरेच जण जबाब नोंदवायलाच आलेले नाहीत.

अनेक प्रश्न कायम...
कल्पना भागवत बनावट कागदपत्रांच्या आधारे ६ महिन्यांपासून जालना रोडवरील ॲम्बेसेडर या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामी होती. सिडको पोलिसांनी २२ नोव्‍हेंबरला तिला अटक केली होती. हॉटेलमध्ये थांबण्यासाठी तिने जे आधारकार्ड दिले होते, त्यावर खाडाखोड केलेली होती. तिच्याकडे केंद्रीय लोकसेवा आयोगातील २०१७ ची यादीही तिच्याकडे मिळाली होती, ती यादीही बनावट असल्याचे स्पष्ट झाले होते. कल्पनाचे अफगाणिस्तानचा नागरिक व भारतात ड्रायफ्रूट व्यावसायिक म्हणून ७ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या मोहम्मद अशरफ गिल (वय २४, ह. मु. जंगपुरा, नवी दिल्ली) याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे तपासात समोर आले होते. ती केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ओएसडींच्या नावाचा वापर करणारा तोतया अधिकारी डिम्पी देवेंद्रकुमार हरजाई (वय ३०, रा. पालम, दिल्ली) याच्या संपर्कात होती. तिघांचा एकमेकांच्या संपर्कात येण्याचा उद्देश लोकांची आर्थिक फसवणुकीचाच होता, की आणखी काही, हे शेवटपर्यंत समोर आले नाही. देशविघातक कृत्याचे पुरावे पोलिसांना मिळाले नाहीत. अशरफच्या पाकिस्तानमधील भावाच्या संपर्कात कल्पना होती. त्यांचे चॅटिंग डिलीट करण्यात आल्याचे समोर आले होते. अपना डीलर पाकिस्तान में हैं, मालूम है ना, असा मजकूर असलेला स्क्रीनशॉट मोबाइलमध्ये आढळला होता, त्याचे गूढ कायम आहे. तिच्याकडे आढळलेल्या पाकिस्तानी लष्कराचे नंबरचे काय? ती १० महिन्यांपासून पाकिस्तानच्या अफगाण ॲम्बॅसी, पेशावर कॅटोन्मेंट बोर्ड, झरदारी सर वाईफ, अफगाणिस्तान ॲम्बॅसी, मुजीब भाई, झरदारी सर, मोहम्मद रजा व नक्ती या नावाने तिच्या मोबाइलमध्ये सेव्ह असलेल्या ११ नंबर्सच्या संपर्कात होती, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले होते, त्याचे काय? कल्पना, अशरफ, डिम्पीने अनेकदा राजस्थान, दिल्ली, मणिपूरमध्ये सोबत प्रवास केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांच्या प्रवासाचा उद्देश काय, कारण फसवणुकीचे गौडबंगाल तर राज्यापुरतेच मर्यादित निघाले... कल्पनाने अशरफच्या भावाच्या रेस्टॉरंटसाठी पाकिस्तानला ३ लाख रुपये पाठविल्याचे समोर आले होते, त्याचे काय... अनेक एक ना अनेक प्रश्न कायम राहिले आहेत...

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software