सिडकोतील जिजाऊ चौकात तुंबळ हाणामारी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सिडकोतील जिजाऊ चौकात ७ ते ८ जणांनी राडा केला. त्‍यांची हाणामारी सुरू असताना पोलीस आले तरी ते ऐकत नव्हते. त्यानंतर ते पळून गेले. पोलिसांनी या अनोळखी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्‍याची ओळख पटवणे सुरू केले आहे. ही घटना गुरुवारी (२५ सप्टेंबर) रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली.

पोलीस अंमलदार शेख नासिर शेख जाकीर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख नासिर आणि त्‍यांचे सहकारी पोलीस अंमलदार देशमुख, गोरे हे टीव्ही सेंटर चौक ते शरद टी पॉईंटदरम्यान पायी पेट्रोलिंग करत होते. जिजाऊ चौकातील सार्वजनिक ठिकाणी रोडवर सात ते आठ व्यक्ती आपापसात हाणामारी करत होते. पोलिसांनी तेथे जाऊन हाणामारी थांबविण्यास सांगितले. तरीही त्यांनी न ऐकता एकमेकांना हाताचापटाने मारहाण करणे सुरूच ठेवले व नंतर पळून गेले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार मंगेश पवार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...

Latest News

सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला... सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको एन ३ भागातील टेनिस कोर्टजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने मंगळसूत्र...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software