जवाहरनगर पोलिसांनी पकडला अट्टल मोबाइल चोरटा!; ४५ हजारांचे ३ मोबाइल जप्त

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जवाहरनगर पोलिसांनी अट्टल मोबाइल चोरट्याला अटक करण्यात गुरुवारी (१३ नोव्‍हेंबर) यश मिळवले. त्याने अनेक मोबाइल चोरी केले आहेत. अलीकडच्या काळात त्याने चोरलेले ४५ हजार रुपयांचे ३ मोबाइल पोलिसांनी जप्त केले असून, साथीदारासोबत मिळून त्याने या हे गुन्हे केले. त्याचा साथीदारही अट्टल चोरटा असून, त्याच्याविरुद्ध १२ हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.

जवाहरनगर पोलीस ठाण्यात बुधवारी (१२ नोव्हेंबर) अब्दुल कदीर चांद शेख (वय ६५, रा. शहाबाजार) यांनी तक्रार दिली होती, की रात्री वेळ ८ ते साडेआठच्या सुमारास मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपवर ते गेले असता त्यांच्या वरच्या खिशात असलेला रेडमी कंपनीचा १० हजार रुपयांचा मोबाइल चोरट्याने शर्टाच्या वरच्या खिशातून चोरून घेतला. कदीर यांनी मोबाइलचा आजूबाजूला व इतर ठिकाणी शोध घेतला. मात्र मिळून आला नाही. त्यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

गुरुवारी (१३ नोव्‍हेंबर) गस्त घालत असताना पोलीस अंमलदार मारोती गोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की शहानूरमिया दर्गा चौकाजवळील मोकळ्या मैदानावर एक जण चोरी केलेले मोबाइल विकण्यासाठी येणार आहे. त्यावरून त्यांनी लगेचच ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांना दिली. त्यांच्या आदेशाने पोलीस अंमलदार मारोती गोरे, संदीप बिलारी हे त्या ठिकाणी गेले. मोबाइल विकण्यासाठी आलेल्या संशयिताला ताब्यात घेत त्याचे नाव, गाव विचारले. त्याने त्याचे नाव मन्सूर उर्फ टका बेग युसूफ बेग (वय ३६, रा. शहानूरवाडी, रेशन किराणा दुकानाजवळ उस्मानपुरा) असल्याचे सांगितले. त्याच्याकडे ३ महागडे मोबाइल मिळून आले. 

साथीदारासोबत मिळून चोरले ३ मोबाइल...
साथीदार सिकंदर खान नजीर खान (वय ४८, रा. शहानूरवाडी, उस्मानपुरा) याच्यासोबत मिळून मेट्रो वाईन शॉप, मोंढा नाका येथे रेडमी मोबाइल, तर सुतगिरणी चौक ते गजानन महाराज मंदिर रोडने रिक्षात सॅमसंग कंपनीचा मोबाईल, तसेच १ महिन्यापूर्वी विवो कंपनीचा मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली. मारोती गोरे आणि संदीप बिलारी यांनी मन्सूरला ताब्यात घेऊन त्याच्याकडील एकूण ४५ हजार रुपयांचे मोबाइल जप्त केले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सिकंदर खानविरुद्ध यापूर्वी चोरीचे १२ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, तर मन्सूरविरुद्धसुद्धा यापूर्वी मोबाइल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई प्रभारी पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त मनिष कल्याणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे तपासीक अंमलदार पोलीस अंमलदार श्री. खलसे, मारोती गोरे, संदीप बिलारी यांनी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software