चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी शिवाजीनगरात आला, जवाहरनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातून चोरीला गेलेली मोटारसायकल शिवाजीनगरात एका तरुणाकडे मिळून आली. तो ही चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी आला होता. जवाहरनगर पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली आणि मोटारसायकलीसह त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी (१९ नोव्‍हेंबर) करण्यात आली.

आकाश रमेश राठोड (वय २३, रा. सातारा तांडा नं. १ सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर) असे संशयिताचे नाव आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार मारोती गोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिवाजीनगर परिसरात आकाश चोरीची मोटारसायकल घेऊन येणार आहे. मारोती गोरे यांनी लगेचच ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांना दिली. त्यांच्या आदेशाने श्री. गोरे यांच्यासह पोलीस अंमलदार अनिल भाले, संदिप बिलारी शिवाजीनगर गाठले. तिथे डीपीजवळ आकाश विनानंबरच्या मोटारसायकलीसह दिसून आला. पोलिसांनी त्याला पकडून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी मोटारसायकलीच्या चेसीस नंबरवरून गाडीचा क्रमांक मिळवला. एमएच २० एफव्ही ४६०८ क्रमांकाची ही दुचाकी असल्याचे समोर आले. मोटारसायकल वैभव बाळकृष्ण वाघोले यांच्या नावावर असून पोलिसांनी त्यांना संपर्क केला असता, त्यांनी मोटारसायकल चोरीला गेलेली असून, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे सांगितले. वाळूज एमआयडीसी पोलिसांशी संपर्क करून अंमलदार राम तांदळे यांच्याकडे जवाहरनगर पोलिसांनी आकाश आणि चोरीचा मोटारसायकल पुढील तपासासाठी सुपूर्द केली. ही कारवाई पोलीस आयुक्त विरेंद्र मिश्रा, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अनिल भाले, मारोती गोरे, संदीप बिलारी यांनी केली.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश

Latest News

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software