हद्दच केली... चक्क मंदिरात दर्शन रांगेतून महिलेचे सोन्याचे गंठण लांबवले!, सिडको एन ४ मधील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मारोती मंदिरात दर्शन रांगेत उभ्या महिलेचे ७० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण कुणीतरी तोडून लांबवले. ही घटना सिडको एन ४ येथे गुरुवारी (४ डिसेंबर) संध्याकाळी सातच्या सुमारास घडली. पुंडलिकनगर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विजयालक्ष्मी शंकरराव परणे (वय ७०, रा. एन ४ सिडको, विसावा गार्डनसमोर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या कुटुंबासह राहतात. त्यांचे पती शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले असून, मुलगा सीएनजी किट बसवण्याचा व्यवसाय करतात. गुरुवारी (४ डिसेंबर) संध्याकाळी सातच्या सुमारास विजयालक्ष्मी व त्यांचे पती सिडको एन ४ येथील मारोती मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शनासाठी महिलांच्या रांगेत उभ्या असताना गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १४ ग्रॅम सोन्याचे शॉर्ट गंठण तोडून नेले. ते ७० हजार रुपयांचे होते. अधिक तपास पोलीस निरीक्षक अर्जुन राऊत करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...

Latest News

सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला... सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको एन ३ भागातील टेनिस कोर्टजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने मंगळसूत्र...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software