प्रा. डॉ. राजन शिंदे हत्येप्रकरणी विधीसंघर्षग्रस्त मारेकऱ्याला जन्मठेप!, छत्रपती संभाजीनगरच्या या घटनेने भल्याभल्यांचे डोके काम करणे झाले होते बंद...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहरातील सिडको एन २ या उच्चभ्रू कॉलनीतील तुकोबानगर भागात ११ ऑक्टोबर २०२१ रोजी डॉ. राजन हरिभाऊ शिंदे यांची घरातच निर्घृण हत्या करण्यात आली होती. चार वर्षांनी या खून खटल्याचा निकाल लागला आहे. विधिसंघर्षग्रस्त मारेकऱ्यावर आरोप सिद्ध झाल्याने बुधवारी (१० डिसेंबर) त्याला जन्मठेप व एक हजार रुपये रोख दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याची रवानगी बालसुधारगृहातून हर्सूल कारागृहात करण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी दिले.

प्रा. डॉ. शिंदे हे मौलाना आझाद कॉलेजमधील इंग्रजी विभागाचे प्रमुख होते. ही हत्या वैयक्तिक वादातून झाली होती. १० ऑक्टोबर २०२१ रोजी शिंदे रात्री ११:३० वाजता घरी परतले होते. हॉलमध्ये झोपलेल्या शिंदे यांचा दुसऱ्या दिवशी पहाटे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला होता. शिंदे झोपेत असताना व्यायामासाठीचे वजनदार डंबेल पाच वेळा मागून डोक्यात मारत, चाकूने गळा कापून, डंबेलने कपाळ, कान, डोळ्याजवळ, चेहरा व मानेवर वार करून दोन्ही हातांच्या नसा कापून कुणाचाही थरकाप उडेल अशा पद्धतीने हत्या केली होती. पोलिसांना पुरावे घराजवळीलच विहिरीत आढळले होते. या हत्‍येने शिक्षण क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली होती.

अल्पवयीन मुलगा आणि प्रा. डॉ. शिंदे यांच्यात वैचारिक मतभेद होते. करिअर निवडण्यातून त्यांचे वाद टोकाला गेले होते. घटनेच्या दिवशी झोपण्यापूर्वी त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. १८ ऑक्टोबरला सकाळी पोलिसांनी अल्पवयीन मारेकऱ्याला ताब्यात घेतले होते. तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी हत्येच्या प्रकरणाचा सखोल तपास केला. चौकशीत मारेकऱ्याने कबुली दिली. हत्या नियोजनबद्ध केल्याचे समोर आले. जानेवारी २०२२ पासून या गुन्ह्याची न्यायालयात सुनावणी सुरू झाली. ५९१ पानांचे दोषारोपपत्र पोलिसांनी सादर केले होते.

मुख्य ७५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी (१० डिसेंबर २०२५) जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने मारेकऱ्याला शिक्षा सुनावली. हत्या केली त्यावेळी मारेकरी १७ वर्षे ८ महिने वयाचा होता. तो कायद्याचा अभ्यासक होता. गुन्हा गंभीर, अघोरी पद्धतीने केल्याने मारेकऱ्याला प्रौढ समजण्यात यावे, या मागणीचा अहवाल १६ नोव्हेंबर २०२१ रोजी बालन्याय मंडळासमोर सादर केला होता. बालमंडळाच्या अध्यक्षांनी प्राथमिक मूल्यांकन करत तसा अहवाल मुख्य न्यायाधीशांकडे पाठवला. मुख्य न्यायाधीशांनी ७ जानेवारी २०२२ रोजी त्याला प्रौढ समजत खटला सत्र न्यायालयात चालवण्यास मान्यता दिली होती. एखादा सराईत, अट्टल गुन्हेगारदेखील इतक्या निर्घृणपणे कृत्य करणार नाही, तितक्या थंड डोक्याने (कोल्ड ब्लडेड) हे हत्याकांड विधिसंघर्षग्रस्त मारेकऱ्याच्या हातून घडले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software