मुकुंदवाडीत नशेखोर, टवाळखोराचा उच्छाद सुरूच!; रस्त्याच्या बाजूला होण्यास सांगितल्याने झेंडा चौकात दूध विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला, रामनगरात ‘पुडी’साठी १०० रुपये मागून चाकूचे वार!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या टवाळखोर, नशेखोरांचा उच्छाद सुरूच आहे. रस्त्याच्या मधोमध उभे राहून वाहने अडवतात. धिंगाणा घालतात. नशेसाठी पैसे मागून हल्ले करतात. पोलीस त्यांना रोखण्यात अपयशी ठरल्याचे चित्र आहे. मुकुंदवाडीतील रेल्वेस्टेशन ते झेंडाचौक रोडवर एका दूध विक्रेत्यावर टवाळखोराने प्राणघातक हल्ला चढवला, तर रामनगरात एका १७ वर्षीय मुलावर नशेखोराने चाकूचे वार केले.

हल्ल्यात दूध विक्रेता गंभीर जखमी 
सोमीनाथ काशीनाथ आहेर (वय ३४, रा. जुने मुकुंदवाडी गाव) यांच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा जबाब मुकुंदवाडी पोलिसांनी नोंदवला. त्यानुसार, सोमीनाथ हे दूध विक्रीचा व्यवसाय करतात. म्हशीचे दूध राजनगर, जयभवानीनगर, मुकुंदनगरमध्ये वेगवेगळ्या घरी देतात. बुधवारी (२९ ऑक्‍टोबर) सकाळी साडेनऊच्या सुमारास ते मोटारसायकलीने दूध वाटण्यासाठी निघाले. जयभवानीनगर येथे दूध वाटले. त्यानंतर रेल्वेस्टेशन ते झेंडाचौकाकडे जात असताना अक्षय शिंगारे पाटील (रा. राजनगर) हा रोडच्या मध्यभागी उभा होता. त्याला सोमीनाथ यांनी रोडवरून बाजूला व्हायला सांगितले असता त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्याला सोमीनाथ हे समजावून सांगत असताना त्याने हाताचापटाने मारहाण करण्यास सुरुवात केली. सोमीनाथ हे त्याला प्रतिकार करत असताना अक्षयने कॅन घेऊन सोमीनाथ यांच्या डोक्यात चार ते पाच वेळा जोरदार प्रहार केला. त्यामुळे सोमीनाथ यांचे डोके फुटले. त्यानंतरही त्याने डाव्या हाताला व डाव्या डोक्याजवळ व ओठावर कॅनने मारहाण केली. त्याचवेळी तिथे सोमीनाथ यांचे नातेवाइक मनोहर शिंदे व बबन शिंदे आले. त्यांनी सोमीनाथ यांची सुटका करत घाटी रुग्णालयात दाखल केले. डोक्यावर दोन ठिकाणी, डाव्या दंडावर दोन ठिकाणी, डोक्याच्या खाली व ओठावर टाके पडले आहेत. मारहाणीत मेंदूजवळ हाड फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अक्षयने डोक्यात दुधाची कॅन चार ते पाच वेळा मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे सोमीनाथ यांनी जबाबात पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी अक्षयविरुद्ध शुक्रवारी (३१ ऑक्‍टोबर) गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे करत आहेत.

पुडीसाठी अल्पवयीन मुलावर चाकूचे वार
गरवारे स्टेडियमजवळील किया शोरूममध्ये काम करणाऱ्या ऋषीकेश नीलेश मोरे (वय १७) याने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, की तो मुकुंदवाडीतील संजयनगरात राहतो. आई-वडील, मोठा भावासह तो राहतो. गुरुवारी (३० ऑक्‍टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नीलेश व त्याचा मित्र आदित्य दीपक दाभाडे रामनगर येथील जय बजरंग कपड्याच्या दुकानात जॅकेट आणण्यासाठी जात होते. त्यांना ओळखीचा यश मनिष विर (रा. संजयनगर गल्ली नं. ८, मुकुंदवाडी) रस्त्यात भेटला. त्याने पुडी चार किंवा १०० रुपये दे, असे म्हटले. त्यावर नीलेशने त्याला पैसे नसल्याचे सांगितले. त्यावरून संतापलेल्या यशने शिवीगाळ करून हाताचापटाने मारहाण केली. त्याच्या खिशातील चाकू काढून नीलेशच्या डाव्या हाताच्या मागे मारून जखमी केले. नीलेशला त्याच्या कुटुंबीयांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर नीलेशने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी यशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार प्रभाकर भिडे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software