सिडको एन ७ मध्ये मंगळसूत्र चोराचा थरार, महिलेचे दीड लाखाचे मिनीगंठण हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सिडको एन ७ मधील साई मंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या २ चोरांनी महिलेचे दीड लाख रुपयांचे मिनीगंठण हिसकावून धूम ठोकली. ही घटना गुरुवारी (१६ ऑक्‍टोबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

अनिता प्रकाश ढगे (वय ४९, सिडको एन ७, साई मंदिराजवळ) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या कुटुंबासह राहतात. त्यांचे पती सेवानिवृत्त झालेले आहेत. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अनिता व त्यांची भाडेकरू महिला बजरंग चौकाकडून घरी येत असताना साई मंदिराजवळ असताना पोस्ट ऑफिसमागे  मनपा शाळेसमोर मागून मोटारसायकलीवरून दोन चोरटे आले. ते म्हणाले, की पीजी होस्टेल कोठे आहे. त्यावर अनिता यांनी आम्हाला माहीत नाही, असे सांगितले.

त्यावर मोटारसायकलीवर मागे बसलेल्या तरुणाने अनिता यांच्या गळ्यातील मिनीगंठण बळजबरीने हिसकावून मोटारसायकलीवरून त्यांनी धूम ठोकली. अनिता यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यातील एकाने चोरांचा पाठलाग केला. पण चोर मिळून आला नाही. चोरट्यांनी अनिता यांचे दीड लाख रुपयांचे मिनीगंठण चोरून नेल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. सिडको पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?

Latest News

विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय? विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्‍ट वृत्तसेवा) : विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार तथा ठाकरे गटाचे जिल्‍हाप्रमुख अंबादास दानवे यांनी...
आरटीओ कार्यालयातच भीषण दुर्घटना : चालकाने ट्रक मागे घेताना निष्काळजीपणा केला अन्‌ एजंटचा चाकाखाली येऊन मृत्यू!
व्हिडीओ : बजाजनगरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, सीसीटीव्हीत थरार कैद
भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले...
रिलस्टार अरुण तुपेचा घरातच आढळला मृतदेह!; सोशल मीडियावर दोन लाख फॉलोअर्स, पोस्ट मार्टेमच्या अंतिम अहवालातून समोर येणार कारण, पोलीस काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software