बजाजनगरात महिलेचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार चोरटे पसार!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दर्शनासाठी श्री स्वामी समर्थ मंदिराकडे जात असलेल्या ४२ वर्षीय विवाहितेचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार मंगळसूत्र चोरट्यांनी धूम ठोकली. ही घटना बजाजनगरातील वैष्णवी मेडिकलसमोर बुधवारी (१० ऑक्टोबर) सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली.

अर्चना अरुण वडाळकर (४२, रा. जयभवानीनगर, बजाजनगर) यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन चोरटे होते. त्यांनी १ लाख रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनी सोन्याचे गंठण हिसकावून नेले. अर्चना यांनी आरडाओरड केली, त्यामुळे लोक धावून आले, मात्र तोपर्यंत चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. गेल्या काही दिवसांत छत्रपती संभाजीनगरसह वाळूज उद्योगनगरीत मंगळसूत्र चोरट्यांनी कहर केला आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software