बजाजनगरात भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले, तरुणी जखमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगरात भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले. यात तरुणी जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी (२८ नोव्‍हेंबर) ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मृणाली बाळु पाटोळे (वय २४, रा. रांजणगाव शेणपुंजी, कमळापूर कबरस्तानमागे) असे जखमी तरुणीचे नाव आहे. तिच्यावर बजाजनगरच्या प्रताप चौकातील स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला. जबाबानुसार, मृणाली आई, वडील, भावासह राहते. तिने जय भवानी चौकातील यशस्वी इस्टिट्यूटमध्ये कॉम्प्युटर क्लास लावला असून, व्हेरॉक कंपनीतही काम करते. बुधवारी (२६ नोव्‍हेंबर) ती भावाच्या मोटारसायकलीवरून कॉम्प्युटर क्लासला निघाली. बजाजनगरच्या आंबेडकर चौकात मागून ट्रकने (क्र. एमएच १९, झेड ४८५२) त्यांना उडवले. यात मृणाली जखमी झाली. अधिक तपास पोलीस अंमलदार केशव चौथे करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Latest News

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढत, धक्काबुक्की करून युवकाने तिची सोन्याची पोत घेऊन पळ...
कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software