- News
- सिटी क्राईम
- पुष्पनगरीत भीषण अपघात : सुसाट क्रेटा कारने स्कुटीला उडवले, एकाचा जागीच मृत्यू, नागरिकांनी कारचालकाला...
पुष्पनगरीत भीषण अपघात : सुसाट क्रेटा कारने स्कुटीला उडवले, एकाचा जागीच मृत्यू, नागरिकांनी कारचालकाला पकडून ठेवत दिले पोलिसांच्या ताब्यात!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सुसाट क्रेटा कारचालकाने दिलेल्या धडकेत ॲक्टिवा स्कुटीवर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात सोमवारी (२२ डिसेंबर) रात्री ९ ला बाबा पेट्रोलपंप ते मध्यवर्ती बसस्थानक रोडवरील पुष्पनगरीतील पारगावकर हॉस्पिटलजवळ घडला.
भरधाव कारची ट्रॅक्टरला मागून धडक बसली. यात कारमधील एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाले. हा अपघात वैजापूर- खंडाळा रस्त्यावरील रोटेगाव उड्डाणपुलाजवळ रविवारी (२१ डिसेंबर) रात्री ११ च्या सुमारास घडला. ऋषिकेश राजू सोळसे (वय २५, रा. लोणी बुद्रूक, ता. वैजापूर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. आदित्य थोरात (वय २२), सिद्धार्थ राजू सोळसे (वय २१) व कृष्णा संतोष कटारे (वय २०, तिघेही रा. लोणी बुद्रूक) जखमी झाले आहेत.
वैजापूर येथून लोणी बुद्रूक येथे ऋषिकेश सोळसे कारने (एम. एच. ०२, सी. आर. ६५४०) आदित्य थोरात, सिद्धार्थ राजू सोळसे, कृष्णा संतोष कटारे यांच्यासह जात होते. त्यावेळी रोटेगाव उड्डाणपुलाजवळ कन्नडकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर कार मागून धडकली. कारमधील ऋषिकेश सोळसे यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींवर वैजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऋषिकेशच्या पार्थिवाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघाताची नोंद वैजापूर पोलिसांनी केली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
महाशिवरात्री कधी आहे? शिवपूजेचा शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत जाणून घ्या...
By City News Desk
वाळूज एमआयडीसीतील हॉटेलमध्ये युवकाच्या आत्महत्येने खळबळ
By City News Desk
दानपेटीत चुकून वस्तू पडल्यास विसरा; परत मिळणार नसल्याचा तुळजाभवानी संस्थानचा अजब फतवा!; भाविकांत संताप
By Bhalchandra Pimpalwadkar
Latest News
22 Jan 2026 08:18:53
रोहित शेट्टीच्या गोलमाल मालिकेतील भाग ४ (गोलमाल अगेन) मधील एक दृश्य खूप प्रसिद्ध आहे. या दृश्यात चित्रपटात वसुली भाईची भूमिका...

