लग्न जुळवायला पैसे घेणाऱ्या महिलेचा कुटुंबावर प्राणघातक हल्ला!, ४ जण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक, रांजणगाव शेणपुंजीतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : लग्न जुळवण्यासाठी घेतलेले पैसे परत मागितल्याने एका महिलेने साथीदारांसह मिळून लग्नाळू नवरदेव व त्याच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला चढवला. यात चौघे जखमी झाले. ही घटना वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी येथे रविवारी (२८ ऑक्टोबर) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

हल्ल्यात दिनेश विठ्ठल इळतवार, त्याचा भाऊ सुनील व आई-वडील गंभीर जखमी झाले असून, सुनीलची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिनेशकडून गल्लीत राहणाऱ्या वंदना बोराडे हिने लग्नासाठी मुलगी असल्याचे सांगून मे महिन्यात साडेतीन लाख रुपये घेतले होते. पैसे मिळाल्यानंतर मात्र वंदना टाळाटाळ करू लागली. यामुळे दिनेशने पैसे परत मागितले. दोन महिन्यांपूर्वी तिने दीड लाख रुपये परत केले. मात्र, दोन लाख रुपये परत करण्यास टाळाटाळ करू लागली. दिनेश व त्याचे कुटुंब रविवारी रात्री वंदनाकडे राहिलेले पैसे मागण्यासाठी गेले. तिने वाद घालत पैसे परत करण्यास नकार दिला.

तिने साथीदारांना बोलावून घेत दिनेश व त्याच्या कुटुंबियांवर तलवार, लोखंडी रॉड, झारे, दगडांनी हल्ला चढवला. जखमी अवस्थेतच दिनेशने तिथून पळ काढून हरिओमनगरमधील बहिणीचे घर गाठले आणि तेथूनच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत सागर साळुंके, दानिश कुरेशी, मोईन सिकंदर शेख, शुभम पवार, पवन कदम आणि वंदना बोराडे यांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या प्रकरणाशी संबंध नसतानाही केवळ सुरू असलेले भांडण पाहण्यासाठी गेलो असता आपल्यावर सुनील, दिनेश, त्यांची आई रुख्मिनी व इतरांनी मिळून हल्ला केल्याची तक्रार सागर अविनाश साळुंके (वय १८, रा. नेहरूनगर) यानेही केली आहे. यात आपण व आपले मित्र दानिश कुरेशी, पवन कदम, मोईन शेख हे जखमी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!

Latest News

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!! शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बेगमपुरा पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार गणेश गायकवाड याने वरिष्ठांच्या नावे तब्बल १४ लाख रुपयांची...
आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक, नोकरी मागण्यासाठी आला होता...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software