- News
- सिटी क्राईम
- कॉलेजमधून घरी आला, थेट पहिल्यावर मजल्यावर जाऊन १९ वर्षीय तरुणाने घेतला गळफास!; सिडको एन ६ मधील धक्का...
कॉलेजमधून घरी आला, थेट पहिल्यावर मजल्यावर जाऊन १९ वर्षीय तरुणाने घेतला गळफास!; सिडको एन ६ मधील धक्कादायक घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सिडको एन ६ मध्ये १९ वर्षीय तरुणाने गुरुवारी (२५ सप्टेंबर) सायंकाळी सहाला राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ओम ज्ञानदेव बनकर (वय १९) असे त्याचे नाव असून, तो बारावीत शिकत होता, सोबतच ॲनिमेशनचा कोर्सही करत होता.
वाळूज एमआयडीसीतील विटावा येथे विजय भगवान चंद्रोल (रा. पांगरी, ता. सिल्लोड, ह.मु. विटावा) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (२५ सप्टेंबर) दुपारी घडली. विजय हा पत्नी व दोन मुलांसह विटाव्यात किरायाने राहत होता. गुरुवारी दुपारी पत्नी व मुले बाहेर गेल्याने विजय घरी एकटाच होता. दुपारी दोनच्या सुमारास त्याने छताच्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर नातेवाइकांनी त्याला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास केला जात आहे.
सिल्लोडमध्ये युवकाची आत्महत्या
सिल्लोड तालुक्यातील सावखेडा येथील देविदास श्यामराव सोने (वय ३८) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (२६ सप्टेंबर) रात्री सातला समोर आली. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी त्यांना फासावरून काढून सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही. सोने यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या घटनेची सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
08 Dec 2025 21:25:50
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...

