गुटखा तस्करांनी बीड बायपासवर घडवला थरार!; अखेर कार उभी करून पळाले, एकाला पकडण्यात यश, दुसरा फरारी...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : गुटखा तस्करांनी बीड बायपासवर मंगळवारी (७ ऑक्‍टोबर) दुपारी तीनच्या सुमारास थरार घडवला. कारमधून लाखो रुपयांचा गुटखा घेऊन जात असल्याचे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना कळले. पोलिसांनी त्‍यांचा पाठलाग सुरू केला. त्‍यांनी सिनेस्टाइल कार दामटत दुभाजकाला उडवत थेट बजाज हॉस्पिटलकडून नाथ व्हॅली शाळेजवळील मैदानाकडे नेली. पुढे रस्ता सूचत नसल्याने कार तिथेच थांबवून त्‍यांनी पायी पळ काढला. पण पोलिसांनी त्यातील एकाच पकडलेच. दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला.

जिशान कासीम शेख (वय २४, रा. साजापूर, छत्रपती संभाजीनगर) व सचिन नागराज म्हस्के (रा. सिडको महानगर १ पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर) अशी गुटखा तस्करांची नावे असून, त्यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधवर (रा. कांचनवाडी, पैठण रोड) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिशानला पकडण्यात आले तर सचिन फरारी झाला. शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ हे मंगळवारी (७ ऑक्‍टोबर) दुपारी तीनच्या सुमारास सहकारी पोलीस अंमलदार खांडेकर, नवसारे, यदमळ, भालेराव यांच्यासह गस्तीवर होते. त्यांना गुप्त बातमीदारामार्फत गुटखा तस्करांची माहिती मिळाली. त्यांनी लगेचच बीड बायपासकडे धाव घेतली.

बीड बायपासवर संशयित कार दिसून येताच त्यांनी थांबविण्यास सांगितले. मात्र कारचालकाने गाडी जोरात पळवून दुभाजकाला धडकवून कमलनयन बजाज हॉस्पिटलकडून नाथ व्हॅली शाळेच्या दक्षिण दिशेला असलेल्या मोकळ्या मैदानाकडे दामटली. पोलीस पाठलाग करत असल्याने मैदानात गाडी थांबवून त्‍यातून दोघे उतरले आणि पळू लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. थोड्याच अंतरावर जिशानला पकडले, तर सचिन पळून जाण्यात यशस्वी ठरला. दोघे क्रेटा कारमधून (क्र. एमएच २० जीव्ही ९४०८) गुटख्याची तस्करी करत होते. कार आणि गुटख्याचा मालकही सचिन असल्याचे जिशानने सांगितले. कारमधून एकूण १८ लाख ७६ हजार ५२० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software