१२ वीत असल्यापासून मैत्री, त्याचा लग्नाचा हट्ट, ब्‍लॅकमेलिंग; २२ वर्षीय तरुणीच्या आत्‍महत्‍येप्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, सिडकोतील घटनेचा उलगडा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वाळूज एमआयडीसीतील प्रसिद्ध औषध कंपनीत नोकरी करणाऱ्या निकिता रवींद्र पवार (वय २२, रा. वांजूळ पोही, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर, ह. मु. आविष्कार कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) या तरुणीने सिडकोतील आविष्कार कॉलनीतील भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ७ सप्‍टेंबरला रात्री दहाला घडलेल्या घटनेचा उलगडा आता होत आहे. निकिताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून सिडको पोलिसांनी तिचा मित्र श्रेयस दिलीप पुराणे (रा. करंजगाव, ता. नेवासा) याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा शनिवारी (१३ सप्टेंबर) दाखल केला आहे.

ओम रवींद्र पवारने दिलेल्या तक्रारीनुसार, श्रेयस आणि निकिताची ओळख करंजगाव येथे बारावीत असल्यापासून होती. दोघांत मैत्री झाली. त्‍याने तिला लग्नाची मागणी घातली. तिने याबाबत भाऊ व आईला सांगितले होते. नंतर निकिताने त्याला लग्नाला नकार दिला व त्‍याच्यासोबत संबंध तोडले होते. मात्र श्रेयसच्या डोक्‍यात प्रेम जात नव्हते.

अतिप्रेमामुळे नैराश्यात गेलेल्या श्रेयसने तिला आपण आधी रिलेशन ठेवू. नंतर लग्नाचे बघू, असे सूचवले होते. त्याला निकिताने नकार दिल्याने तो तिला सतत हट्ट करत राहिला. पूर्वीप्रमाणे संबंध ठेवले नाहीतर आपले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेल, असे तो तिला म्हणाला असता निकिताचीही मनः.स्थिती बिघडली. तिने याबाबत तिच्या आईला सांगितले होते.

अशी घडली होती घटना...
निकिता बी. फार्मसी शिकलेली होती. दीड महिन्यापूर्वीच वाळूज एमआयडीसीतील वोक्हार्ट कंपनीत तिला नोकरी लागली होती. आविष्कार कॉलनीत ती दोन मैत्रिणींसह राहत होती. रोज कंपनीत बसने ये-जा करत होती. तिने टोकाचे पाऊल उचलले तेव्हा तिच्या दोन्ही रूममेट गावी गेल्या होत्या. ७ सप्‍टेंबरला निकिता कंपनीत गेली नव्हती. रात्री दहाला शेजारच्या रूममधील मुली तिला जेवायला मेसवर जाण्यासाठी बोलवायला आल्या. मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मुलींनी खिडकीतून डोकावले. तेव्हा त्यांना धक्काच बसला. निकिता फासावर लटकलेली होती. मुलींनी घरमालकाला कळवताच त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने निकिताला फासावरून काढत तत्‍काळ घाटी रुग्णालयात दाखल केले.

मात्र डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले होते. पंचनाम्यात पोलिसांना ३ सुसाइड नोट मिळून आल्या आहेत. यातील दोनमध्ये खाडाखोड केलेली असून, तिने त्‍या फाडलेल्या होत्‍या. एका सुसाइडमध्ये मम्मी, भाऊ, आजी-आजोबा मला माफ करा. माझ्यामुळे तुम्‍हाला त्रास होईल, असे लिहिलेले आढळले. दादा आईची काळजी घे. वडीलही सोडून गेले, मीही जगण्यास कंटाळले आहे, असाही उल्लेख आहे. मला माफ करा, असे नमूद केले होते. आत्‍महत्‍येच्या आदल्या दिवशी निकिताने कुटुंबीयांना कॉल करून तुमच्या मोबाइलवर एक फोन येईल, तो ब्‍लॅकलिस्टमध्ये टाका. त्‍याचा फोन घेऊ नका, असे सांगितले होते. तरीसुद्धा कुटुंबीयांच्या फोनवर अनोळखी २५ कॉल आल्याची माहिती तिच्या भावाने पोलिसांना दिली होती. त्यामुळे पोलीस ब्‍लॅकमेलरच्या शोधात होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी

Latest News

ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रिजवाडी येथील गट क्रमांक ३० मधील ५४ एकर ३१ आर जमिनीच्या...
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-ब चाळणी परीक्षा २२ मार्चला; छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ हजार ६४० उमेदवार देणार परीक्षा
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
खिडक्या, शू रॅकमध्ये चाव्या ठेवणे करा बंद, वाढताहेत चोऱ्या, जाताहेत मौल्यवान वस्तू, आता सिडको एन ६ मध्ये चोरी!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software